Optical Illusion : पेंटिंगमध्ये लपलंय मोठं रहस्य, केवळ 9 सेकंदात शोधून दाखवा

ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते.    

Updated: Oct 13, 2022, 01:08 AM IST
Optical Illusion : पेंटिंगमध्ये लपलंय मोठं रहस्य, केवळ 9 सेकंदात शोधून दाखवा title=

Optical Illusion Find A Woman : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 

 या फोटोमध्ये एक मांजर आहे जिच्या तोंडात एक उंदीर पकडलेला दिसल्याचं प्रत्येकाला दिसेल. मात्र ते सत्य नाही आणखीन एकक गोष्ट आहे जी तुम्हासा अद्यापही दिसली नाही. ऑप्टीकल इल्यूजनमधील (Optical Illusion) फोड शोधताना दहा सेकंदाचा अवधी संपला तरी काळजी करू नका. पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि फोटो पाहा. आता तुमची नजर मधोमध ठेवा आणि थोडं खाली या. स्त्रीचा चेहरा आहे तो दिसेल मात्र अनेकांना मांजर दिसली जिच्या तोंडात एक उंदीर आहे. 

हे सुंदर पेंटिंग आर्मेनियन कलाकार आर्टुश वोस्क्यान यांचं आहे. जे अतिवास्तववादाच्या थीमवर पेंटिंगसाठी ओळखले जातात. आपण स्वयंपाकघरातील शेल्फच्या वर बसलेली एक मांजर पाहू शकता जिथे त्याने एक उंदीर पकडला जो त्याचे आवडते अन्न चोरण्याचा प्रयत्न करीत होता. 

अतिवास्तववाद ही एक चळवळ आहे जी पहिल्या महायुद्धानंतर 20 व्या शतकात कला आणि साहित्याच्या क्षेत्रात तंत्र विकसित करण्याच्या उद्देशाने सुरू झाली ज्याद्वारे अचेतन मन स्वतःला व्यक्त करू शकते. एक सूचना तुम्हाला मदत करू शकते. लपलेली स्त्री चित्राच्या डावीकडे नाही उजवीकडे आहे.