शेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...

Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

Updated: Oct 12, 2022, 11:07 PM IST
शेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच... title=

Trending Video : सोशल मीडियावर अनेक मजेदार आणि भन्नाट व्हिडीओ (Social Media) आपल्याला पाहिला मिळतात. काही व्हिडीओ पाहून तर आपल्याला हसू आवरत नाही. सोशल मीडियावर काही धक्कादायक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल (Video Viral) होत असतात. काही थरारक व्हिडीओ यूजर्सला प्रचंड आवडतात आणि असे व्हिडीओ खूप पाहिले जातात. अशातच आता बाप-लेकीचा एक धक्कादायक व्हिडीओ (Accident Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

इंटरनेटवर रस्त्यावर दररोज अपघातांचे व्हिडिओ (Trending Video of Accident)  शेअर केले जातात, मात्र हा व्हिडिओ अपघातातून बचावल्याचा आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक रस्त्यावर उभे असल्याचं दिसतंय. पण या सगळ्यांना इथं काय होणार आहे याची कल्पना देखील नसेल. या व्हिडिओमध्ये एक कार भरधाव वेगाने रस्त्यावर धावताना दिसत आहे.

आणखी वाचा- लग्नमंडपात वधु-वराची Free style wrestling, वारंवार पाहिला जातोय हा Viral Video

कार गेल्यानंतर रस्त्यावरील लोक बोलत उभी असतात. त्याचवेळी काही सेकंदांनी एक मुलगी सायकलवरून (Father Daughter Video) येताना दिसते. त्या सायकलचा वेग खूप असतो. सायकलीवर बसलेली मुलगी खुप वेगाने सायकल पळवत असते. मात्र, नंतर तिला सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ViralHog (@viralhog)

दरम्यान, मुलगी लोखंडी खांबाला धडकणार इतक्यात तिचे वडील पळत जातात आणि मुलीला सायकलवरून उचलून घेतात. त्याचवेळी सायकल जोरात जाऊन खांबाला धडकते. हा सर्व प्रकार एका क्षणात घडला. हा सर्व प्रकार पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. चांगली गोष्ट म्हणजे मुलीला दुखापत झाली नाही आणि तिचा जीव वाचला. काही सेकंदापूर्वी गेलेली कार काही क्षणानंतर आली असती तर मोठा अपघात घडला असता. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.