मुंबई : कोरोना (Corona) संसर्गामुळे देश मोठ्या अडचणीत सापडला. अनेकांनी कोरोनामुळे आपली जवळची व्यक्ती गमावली. तसेच कोरोनावर उपचारांसाठी (Corona Treatment) मोठ्या प्रमाणात खर्च झाला. दरम्यान केंद्र सरकारने कोरोना बाधितांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना बाधितांना उपचार खर्चावरील करातून अनेक प्रकारे सवलत देण्यात आली आहे. वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबतची माहिती दिली. (Big relief to Corona affected tax will not be charged on the cost of treatment exemption will also be available on amount of help)
एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला तसेच एक कर्मचारी आपल्या सहकाऱ्याला उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत देत असेल, तर कर्मचारी आणि त्याचा उपचार घेणाऱ्या अशा दोघांना करातून मुक्ती मिळेल.
Announcing measures related to tax concessions for payment towards COVID treatment/death.Amount paid for medical treatment to an employee by employer or to a person by any person on account of COVID for '19-20&subsequent yr won't be taxed in hands of employee/beneficiary: MoS Fin pic.twitter.com/x9sZOhJrUV
— ANI (@ANI) June 25, 2021
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा कुटुंबियांना कंपनीकडून मदत दिली तर ते पूर्णपणे करमुक्त देखील असेल. दोन्ही प्रकारचे फायदे आर्थिक वर्ष 2019-20 आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये मिळतील. कोरोना बाधित व्यक्तींना ही मदत देण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे नियम केवळ कंपन्यांना लागू असतील असं नाही.
जर एखाद्या व्यक्तीने या कठीण परिस्थितीत दुसर्यास मदत केली तर तेही करमुक्त होईल. यासाठीची मर्यादा 10 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Pan-Aadhaar linking साठी मुदतवाढ
पॅन आणि आधार लिंक (Pan-Aadhaar linking) करण्यासाठीच्या मुदतीत 3 महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. सध्या याची अंतिम मुदत ही 30 जूनपर्यंत होती.
संबंधित बातम्या :
Pan-Aadhaar link | दिलासादायक! पॅन-आधार लिंक करण्यास पुन्हा मुदतवाढ
Coronavirus : राज्यात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी, या सहा जिल्ह्यांत कडक निर्बंध