मुलासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अक्षय कुमारला जन्मठेपेची शिक्षा

अक्षय कुमार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Updated: Oct 4, 2022, 08:44 PM IST
मुलासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अक्षय कुमारला जन्मठेपेची शिक्षा  title=

मुंबई : न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ब्रजेश कुमार पाठक आणि विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश ब्रजेशकुमार पाठक यांनी कुटुंबा पोलीस ठाण्यातील एका खटल्याचा निकाल देताना दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. काही दिवसांआधी शिक्षेच्या मुद्द्यावर सुनावणी होऊन कुटुंबा पोलीस ठाण्यातील रेती येथील रहिवासी असलेला एकमेव आरोपी अक्षय कुमार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
 
नेमकं काय आहे प्रकरण?
अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी 6 ऑगस्ट 2020 रोजी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. त्यामध्ये, आरोपीने माझ्या मुलाला चालण्याच्या बहाण्याने नदीच्या काठावर नेलं होतं. आजूबाजूला कोणी नव्हतं याचाच फायदा घेत आरोपीने मुलासोबत अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

पीडित मुलाची अवस्था एकदम गंभीर झाली होती. नराधम आरोपी अनैसर्गिक पद्धतीने  शारीरिक संबंध ठेवत होता तेव्हा पीडित मुलाला असह्य वेदना होत होत्या. मुलाच्या त्या भागातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घरी कसं सांगायचं म्हणून त्याने घरच्यांपासून ही घटना लपवली. 

मुलाने जरी ही घटना लपवली तरी घरच्यांना त्याच्या वागण्यावरून संशय आला. पीडित मुलाला विश्वासात घेऊन घरच्यांनी त्याच्याकडून माहिती घेतली. पीडित मुलावर औरंगाबादच्या रूग्णालयात तीन दिवस उपचार करण्यात आले. आरोपीला 4 POCSO कायद्यांतर्गत जन्मठेप आणि 10 हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दंड न भरल्यास त्याला एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीला 30 जून रोजी दोषी ठरवून जामीन रद्द करून तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.