तमिळनाडू: मनासारखा जोडीदार शोधण्याचे आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोशल मीडिया असेल किंवा ऑनलाइन वधू-वर सूचक मंडळ असेल. आपल्याला हवी तशी वधू किंवा वर शोधणं अगदी सोपं झालं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपलोड केल्या की त्यामध्ये सूट होणाऱ्या व्यक्ती जाहिरात देणाऱ्याशी संपर्क साधतात.
तमिळनाडूमध्ये तब्बल 40 हजारहून अधिक ब्राह्मण तरुणांना वधू मिळत नाही. ही समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आता तमिळनाडूतील ब्राह्मणांनी एक वेगळी मोहीम सुरू केली आहे.
तमिळनाडूमधील ब्राह्मण आता उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वधू शोधण्याची मोहीम राबवत आहेत. तमिळनाडू बाह्मण असोसिएशने ही मोहीम सुरू केली आहे. 30 ते 40 वयोगटातल्य़ा तरुणांना वधू शोधण्यात अडथळा येत आहे.
10 मुलांमागे 6 मुली आहेत तमिळनाडूमध्ये वधू मिळत नसल्यानं ही समस्या निर्माण झाल्याची माहिती तमिळ बाह्मण असोसिएशनचे अध्यक्ष एन नारायण यांनी दिली. वधू शोधण्यासाठी दिल्ली, लखनऊ, पाटणा इथे समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वधू शोधण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. अजून अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यावर विचार केला जाण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं आहे. तर दुसरीकडे मुली हे एकच कारण नाही तर इतरही अनेक कारण असल्याने ही समस्या असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे.
वराच्या घरच्यांना लग्न हे साध्या पद्धतीनं नको असतं. शिवाय महागडे लग्न आणि त्याचा खर्च उचलण्याची बऱ्याचदा परिस्थिती वधू पक्षाची नसते. महागडं लग्न स्टेटससाठी केलं जातं. त्यामुळेही ही समस्या निर्माण झाली आहे. अनेक अटी आणि आर्थिक कुचंबणा यामुळे देखील ही समस्या उद्भवल्याचं एन नारायण यांनी सांगितलं आहे.