मुंबई : पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये (Post Office Scheme) केलेली गुंतवणूक (Investment) ही सुरक्षित मानली जाते. साधारणपणे कोणत्याही गुंतवणुकीशी संबंधित जोखीम (Financial Risk) असते. पण जोखीम पत्कारण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. अशा परिस्थितीत गुंतवणूक अशा ठिकाणी करा जिथे पैसे सुरक्षित राहतील. तसेच चांगला परतावाही मिळेल. तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला नफाही मिळेल, तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. (best scheme for investment in post office daily invest 50 rupees in gram suraksha scheme and get 35 lakhs know info in details)
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशी पोस्ट ऑफिसची चांगली योजना आहे. ज्यामध्ये धोका नगण्य आहे. परतावाही चांगला मिळतो. 'ग्राम सुरक्षा स्कीम (Gram Suraksha Scheme) योजनेबाबत आपण जाणून घेणार आहोत.
या योजनेत दरमहा 1 हजार 500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास आगामी काळात तुम्हाला 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.
गुंतवणूकदार भारतीय असावं. गुंतवणूकदारचं वय किमान 19 कमाल 55 वर्ष इतकं असावं. या योजनेनुसार किमान विमा राशी ही 10 हजार तर कमाल 1 लाख रुपये इतकी असू शकते.
या योजनेतचा हफ्ता मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक स्वरुपात भरण्याची मुभा आहे.
प्रीमिअम पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सुट मिळू शकते.
विशेष म्हणजे या याजनेच्या आधारावर कर्जही घेऊ शकता.
3 वर्षांनंतर ही स्कीम सरेंडर करता येईल, मात्र कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही. म्हणजेच गुंतवलेली एकूण रक्कमच परत मिळेल.
वयाच्या 19 व्या वर्षी तरुणाने या योजनेत 10 लाखांची पॉलिसी घेतली. तर त्याला 55 वर्ष मासिक हफ्ता म्हणून 1 हजार 515 रुपये द्यावे लागतील. तसेच 58 वर्षांसाठी हा आकडा 1 हजार 463 तर 60 वर्षांसाठी 1 हजार 411 रुपये भरावे लागतील. गुंतनवणूकदाराला 55 वर्षांसाठी 31 लाख 60 हजार रुपये, 58 वर्षांसाठी 33 लाख 40 हजार रुपये, तर 60 वर्षांनंतर 34 लाख 60 हजार रुपये इतकी रक्कम मॅच्युरिटीनंतर मिळेल.