Gold Investment Plan: गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण गणित

Gold Investment For Better Return: सोन्याच्या गुंतवणुकीकडे  सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. आजही अनेक जण सरफाकडे जाऊन शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करतात. मात्र कालानुरूप सोन्याच्या गुंतवणुकीत अनेक बदल होत गेले आहेत. डिजिटल गोल्डमुळे याबाबत लोकप्रियता आणखी वाढली आहे.

Updated: Nov 28, 2022, 06:17 PM IST
Gold Investment Plan: गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण गणित title=

Gold Investment For Better Return: सोन्याच्या गुंतवणुकीकडे  सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. आजही अनेक जण सरफाकडे जाऊन शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करतात. मात्र कालानुरूप सोन्याच्या गुंतवणुकीत अनेक बदल होत गेले आहेत. डिजिटल गोल्डमुळे याबाबत लोकप्रियता आणखी वाढली आहे. सोन्यात गुंतवणुकीसाठी (Gold Investment) फिजिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड, गोल्ड बॉण्ड्स आणि गोल्ड ईटीएफ यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. मग आता प्रश्न पडतो की, सोन्यातील नेमकी कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल.  चला तर सोन्यातील फरक समजून घेऊयात

  • Gold Buy- तुम्ही सराफाकडे जाऊन सोनं खरेदी करू शकता. ज्वेलरी, कॉइन, बिस्किट अशा माध्यमाने सोनं विकत घेऊ शकता. ज्वेलरी घेताना मेकिंग आणि डिजाइनिंग चार्ज वेगळा द्यावा लागतो. पण घरात ठेवताना सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. सोनं विकताना टॅक्स किंवा शुद्धता प्रमाणपत्र याबाबत विचारणा केली जाते. दुसरीकडे, चोरी किंवा अशुद्धतेबाबत भीती असते.
  • Digital Gold- डिजिटल गोल्ड विकणाऱ्या अ‍ॅप्सवरून तुम्ही खरेदी करू शकता. डिजिटल सोन्यामध्ये नियमन नसल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
  • Gold ETFs- गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्सचे व्यवहार स्टॉक एक्स्चेंजवर केले जातात. यात फिजिकल गोल्ड आणि गोल्ड मायनिंग/रिफायनिंग अंडरलाइंग असेट असतात. गोल्ड ईटीएफ शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे प्रभावित होतात.
  • Gold Mutual Funds- गोल्डमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड आहे. यात असेट मॅनेजमेंट कंपनी मॅनेज करते. गोल्ड म्युच्युअल फंड शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे प्रभावित होतात.
  • Sovereign Gold Bonds- केंद्रीय रिझर्व्ह बँक सॉवरेन गोल्ड बॉण्ड रिलीज करते. यात पात्र गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.

बातमी वाचा- तुम्ही Wi-Fi Debit Card वापरता? ही काळजी घ्या अन्यथा पैसे गेलेच समजा

खर्च आणि परताव्याच्या दृष्टीने कोणते चांगले आहे?

  • दागिने घेताना मेकिंग/डिझाइनिंग शुल्क भरावे लागते. तसेच विमा आणि स्टोरेज शुल्क देखील लागू शकते. ज्वेलर्स तुमच्या खरेदीवर तुमच्याकडून जीएसटी देखील घेतात.
  • डिजिटल गोल्डवर जीएसटी भरावा लागतो. दुसरीकडे स्प्रेड चार्ज म्हणजेच खरेदी आणि विक्रीमधील फरक कॅलक्युलेट केला जातो.
  • गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करताना एक्सपेंस रेशियो, डिमॅट अकाउंट फीस आणि ब्रोकरेज चार्ज द्यावा लागतो. 
  • सॉवरेन गोल्डवर कोणतंही शुल्क देण्याची आवश्यकता नसते.