Metro Accident : यात मायलेकाची काय चूक होती? मेट्रोच्या कामावेळी पिलर पडून दोघांचाही मृत्यू

बांधकाम सुरु असलेल्या मेट्रोचा पिलर अंगावर पडून महिला आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. यात या महिलाचा पती आणि दुसरा मुलगा जखमी झाले आहेत.

Updated: Jan 10, 2023, 06:47 PM IST
Metro Accident : यात मायलेकाची काय चूक होती? मेट्रोच्या कामावेळी पिलर पडून दोघांचाही मृत्यू  title=

Metro Accident: मेट्रोचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी आज एक दुर्घटना घडली. मेट्रोचं पिलर (Metro Pillar) कोसळून एक महिला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बांधकाम सुरु असताना पिलर दुचाकीवर कोसळला. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर या दुर्घटनेत त्या महिलेचा पती आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. मृत महिलेची ओळख पटली असून तेजस्विनी असं तिचं नाव असून ती 25 वर्षांची आहे तर मृत मुलाचं नाव विहान असं असून तो अडीच वर्षांचा होता. 

बंगलोर मेट्रोच्या ठिकाणी दुर्घटना
ही दुर्घटना बंगळुरुचे मेट्रो (Bangalore Metro) बांधकामाच्या ठिकाणी घडली. पीडित कुटुंबाने कंत्राटदार आणि नागार्जुन कंस्ट्रक्शन कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तज्ज्ञांच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं बंगळुरुचे पोलीस उपायुक्त भीमाशंकर गुलेड यांनी म्हटलं आहे. बंगलोर मेट्रो रेल कॉपोर्रेशन लिमिटेडने (Bangalore Metro Rail Corporation Limited) या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत उभारण्यात आलेल्या लोखंडी पिलरमध्ये तांत्रिक दोश होता. तसंच कामगारांचा बेजबाबदरपणाही आढळून आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिव्हिल इंजिनिअर असलेले लोहित कुमार पत्नी तेजस्विनी मान्यताला टेक पार्क इथं तर आपल्या दोन मुलांना चाईल्ड केअर सेंटरला सोडण्यासाठी दुचाकीने जात होते. याचवेळी लोखंडी पिलर त्यांच्या दुचाकीवर कोसळला. या दुर्घटनेत लोहित कुमार आणि एका मुलाला किरकोळ दुखापत झाली तर तेजस्विनी आणि विहानच्या डोक्याला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : Crime News : 'तुम सिर्फ मेरी हो....'; आठवीतल्या मुलानं गळ्यावर चाकू ठेवत सहावीच्या मुलीच्या भांगेत भरला सिंदूर

लोहित कुमार यांच्या कुटुंबियांनी बीएमआरसीएलला या दुर्घटनेप्रकरणी दोषी धरलं आहे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणापासून कमीतकमी 30 मीटरची सुरक्षित जागा ठेवणं गरजेचं असताना बीएमआरसीएलने सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नव्हते. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळून वाहनांची ये-जा सुरु होती.

मेट्रोलचा लोखंडी पिलर एखाद्या बसवर कोसळला असता तर याहून मोठी दुर्घटना घडू शकली असती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. बीएमआरसीएलने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.