लग्नावर 6 कोटींचा खर्च, पंगाट नवऱ्याचं पत्नीसोबत नशेत केलं किळसवाणं कृत्य

खर्च केला आणि वाया गेला, लग्नावर 6 कोटींचा खर्चानंतरही जावयाचं मुलीसोबत दृषकृत्य  

Updated: Aug 13, 2022, 11:42 PM IST
 लग्नावर 6 कोटींचा खर्च, पंगाट नवऱ्याचं पत्नीसोबत नशेत केलं किळसवाणं कृत्य title=

Bengaluru Crime News : लग्न म्हटलं की एकदम थाटामाटात पार पाडण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, यासाठी काहीजण कर्जही काढतात आणि त्यांच्या परीने लग्न एकदम धुमधडाक्यात करतात. घरात एकुलती एक मुलगी असेल तर लाडलीच्या लग्नात घरचेही पाण्यासारखा पैसा खर्च करतात. यामध्ये जावयाला एकदम महागड्या भेटवस्तू म्हणून बंगला, गाडी किंवा सोनं देतात. मात्र एवढं सगळं देऊनही जर त्या मुलाने त्यांच्या मुलीचा छळ किंवा मारहाण केली तर तिच्या आई-वडिलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक वाटत असेल. बंगळुरूहून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. 

तेलंगणातील एका प्रसिद्ध गारमेंट फॅक्टरी मालकाने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये करोडोंचा खर्च केला होता. मुलींच्या घरच्यांनी लग्नामध्ये 6 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. यामध्ये त्यांनी जावयाला 4 किलो सोनं आणि एक कूपर कार हुंडा म्हणून दिली होती. त्यासोबतच तेलंगणामध्ये दोन मोठे कपड्याचे शोरूमही त्यांनी जावयाला दिले.  

जावई निघाला मद्यपी 
लग्नामध्ये इतकं सर्व काही दिलं मात्र जावई मद्यपी निघाला. जावई संदीपने आपल्या मित्रांसोबत दारूची पार्टी केली आणि त्यानंतर तो घरी आपल्या मित्रांना घेऊन आला. त्यावेळी पत्नीने त्याच्या मित्रांना घरी घेण्यास नकार दिला. त्यानंतर पंगाट झालेल्या पतीने ड्रग्जच्या नशेमध्ये पत्नीला मारहाण करत तिच्या अंगावर लघुशंका केली.

पत्नीने पोलिसात धाव घेत पती संदीपवर कारवाईची मागणी केली आहे. बसवनागुडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मद्यपी आरोपीला पकडण्यासाठी तपास यंत्रणांना कामाला लावलं आहे.