बेल्जियमच्या तरुणीने पंजाबच्या निहंगशी केले लग्न; फेसबुकवर मैत्री झाली अन्...

Love Story :  बेल्जियमच्या एका तरुणीने फेसबुकवर भेटल्यानंतर पंजाबमधील कपूरथला येथील निहंग झैल सिंग याच्याशी लग्न केले आहे. सहा महिन्यांपूर्वी दोघांची फेसबुकवर मैत्री झाली होती,  

Updated: Nov 11, 2022, 04:12 PM IST
बेल्जियमच्या तरुणीने पंजाबच्या निहंगशी केले लग्न; फेसबुकवर मैत्री झाली अन्...     title=

belgium girl marriagem : प्रेमाला कोणतीही सीमा बांधू शकत नाही. ही गोष्ट पुन्हा एकदा बेल्जियममधील (Belgium) एका तरुणीने सिद्ध केली आहे. बेल्जियमच्या जगदीपला फेसबुकवर (facebook love story) एका पंजाबी तरुणाशी प्रेम झाले आणि प्रेमाच्या शोधात ती पंजाबमध्ये आली. त्यानंतर शीख रीतिरिवाजांनुसार तरुणाशी लग्न केले.

दरम्यान जगदीपची कपूरथलाच्या (Jagdeep's Kapoorth) सिंधवा डोना गावातील निहंग (Nihang) तरुण झैलसिंगसोबत फेसबुकवर मैत्री होती. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि जवळीक इतकी वाढली की हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. जगदीप 8 महिन्यांपूर्वी सर्व अडथळे आणि बंधने तोडून कपूरथळाला पोहोचली. यानंतर तिचे आणि निहंग झैलसिंगचे लग्न झाले. 

वाचा : भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

गुरुद्वारा साहिबमध्ये अमृतपान करून विवाह

जगदीपने केवळ लग्नच केले नाही तर अमृतपान करून शीख धर्मही स्वीकारला आहे. हे दोघे मंगळवारी सुलतानपूर लोधी येथील गुरुद्वारा बेर साहिब येथे नतमस्तक झाले, तेव्हा भाविक त्यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसले.

तसेच निहंग झैलसिंगने (Nihang Zail Singh ) सांगितले की, बेल्जियममध्ये राहणाऱ्या जगदीप कौरशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती, मात्र जगदीपला पूर्वी पंजाबी भाषा समजत नव्हती. तिला फक्त इंग्लिश समजते, पण फेसबुकवर चॅटिंग करताना ती प्रेमात पडली. त्यानंतर सुमारे 8 महिन्यांपूर्वी जगदीप बेल्जियमहून कपूरथला येथे आली. यानंतर एकमेकांचे जीवनसाथी बनून आयुष्याच्या नव्या पर्वाचा आनंद घेत आहेत.