पंतप्रधान मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधीच #GoBackModi ट्वीटरवर ट्रेंड

फेसबुकवर देखील युजर्स 'गो बॅक मोदी' हॅशटॅग वापरून अनेक पोस्ट लिहित आहेत. 

Updated: Jan 27, 2019, 09:00 AM IST
पंतप्रधान मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधीच #GoBackModi ट्वीटरवर ट्रेंड  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते  अनौपचारीकरीत्या निवडणूकीचे बिगूल वाजवतील. पण तामिळनाडूच्या मदुराई दौऱ्याआधीच भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदी यांना सोशल मीडियावर मात मिळाली आहे. रविवारी पंतप्रधान मोदी हे मदुराईतील एम्स हॉस्पीटलची पायाभरणी सोहळ्यात उपस्थित असतील. पण या कार्यक्रमत पोहोचण्याआधीच 'गो बॅक मोदी' ( #GoBackModi ) हा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड होतोय. त्यामुळे भाजपा यामुळे चांगलाच खजिल झाल्याचे दिसून येत आहे. अनेक कार्टुन्समध्ये पंतप्रधानांना भगव्या रंगातील जॅकेटमध्ये दाखवण्यात आले आहे. फेसबुकवर देखील युजर्स 'गो बॅक मोदी' हॅशटॅग वापरून अनेक पोस्ट लिहित आहेत. 

केंद्रातील सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याची भावना जनतेमध्ये आहे. यामुळे राज्यातील जनतेचा राग समोर येत आहे. सायक्लोनमुळे कित्येक जिल्ह्यातील 3 लाखाहून अधिकजण बेघर झाले आणि 11 लाखाहून झाडेही वाहून गेली. याचा खूप मोठा परिणाम लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर झाला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लागलेल्या पोस्टर्समध्ये चक्रीवादळानंतर लोकांपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यातील सरकारचे अपयश दिसत आहे. राज्यातील लोकांचा विशेष राग या कारणामुळेच आहे. 

तूतीकोरिनमध्ये स्टरलाइट प्रदर्शनादरम्यान झालेल्या गोळीबाराबद्दलही पंतप्रधान मोदी शांत राहिले होते असा आरोप करण्यात येतोय. स्टरलाइट विरोधी प्रदर्शनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला. एवढंच नव्हे तर कावेळी जल प्रकरणी केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे तामिळनाडूच्या जनतेला केंद्र सरकारविरोधात राग आहे असे म्हटले जातेय. हा राग ट्वीटरवर 'गो बॅक मोदी' हॅशटॅगमधून समोर येतोय. 

Image result for narendra modi in tension zee news

हा हॅशटॅग ट्रेंड होण्याच्या मागे आम्ही नाही आहोत. हा लोकांचा राग आहे. एम्स रुग्णालयाचे काम आजपासून दोन वर्षे आधी सुरू व्हायला हवे होते. आतापर्यंत इथे कामकाजाला सुरुवात देखील व्हायला हवी होती. त्यांनी या प्रकल्पाला उशीर का लावला ? निवडणुकीआधी याचा पाया रचणे हे नाटक असल्याचे डीएमके प्रवक्ता ए. सर्वनन यांनी 'एनडीटीव्ही'ला सांगितले. 

पंतप्रधानांना ऑनलाईन विरोध होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ते डिफेंस एक्स्पो दौऱ्यावर असताना देखील #GoBackModi ट्रेंडमध्ये होते. विरोधी पक्षांशी संबंधित शेकडो आंदोलनकर्त्यांनी त्यावेळी हवेत काळे फुगे उडवले होते.