नवी दिल्ली : अतिशय गतीने डिजिटलकडे जग वाढत असतांना फसवणुकीच्या घटना देखील वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनी एअर एशियाने एक सावधानीचा इशारा दिला आहे.
सोशल मीडियाद्वारे आणि इतर माध्यमांद्वारे फ्री मध्ये तिकीट मिळत असल्याचे मॅसेज फिरत आहेत. सोशल मीडियावर ऑनलाइन पोर्टलद्वारे विनामूल्य तिकीट देण्याविषयी माहिती दिली जात आहे. एअर एशियाने ही माहिती चुकीची असून एक फसवणूक असल्याचं एअर एशियाने म्हटलं आहे. ब्रँडचा चुकीचा वापर करुन लोकांची फसवणूक केलं जात असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
एअर एशियाने असे ही म्हटले आहे की, यापासून सावध राहा. संबंधित कंपनीद्वारे पाठविलेल्या लिंकवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. खोट्या योजनेने कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा लाभ झाला तरी त्याला कंपनी जबाबदार नसेल. कंपनीने मोफत तिकीट देणाऱ्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रवाशांना त्यांनी आवाहन केलं आहे की कोणी ब्रँडचा वापर करुन अशी ऑफर देत असेल तर त्याची माहिती एअर एशियाच्या अधिकाऱ्यांना द्यावी.
[Press Statement] Scam Alert: Beware of free tickets scams using #AirAsia brand pic.twitter.com/FU5mvyZYLc
— AirAsia (@AirAsia) January 23, 2018