Battery Waste Management : वापलेली बॅटरी फेकून देताय... थांबा... वाचा, सरकारने काय आदेश दिलाय

वापरलेली बॅटरी किंवा सेल आपण फेकून देतो, पण आता असं करण्याआधी विचार करा

Updated: Aug 25, 2022, 03:03 PM IST
Battery Waste Management : वापलेली बॅटरी फेकून देताय... थांबा... वाचा, सरकारने काय आदेश दिलाय title=

Battery Waste Management: रिमोट, घड्याळ किंवा इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये बॅटरीचा (Cell) वापर केला जातो. बॅटरी संपली की ती आपण फेकून देतो. पण आता तुम्ही वापरलेले सेल फेकून देत असाल तर थांबा. कारण बॅटरी तयार करणारी कंपनी वापरलेली बॅटरी खरेदी करणार आहे, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. सरकारने बॅटरी उत्पादक कंपन्यांना (Battery Manufacture Companies) कचरा व्यवस्थापन नियमांचं (Waste Management Rules) काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. 

मंत्रालयाने जारी केलं नोटीफिकेशन
सरकारने यासंदर्भात आदेश दिला असून बॅटरी निर्मात्या कंपन्यांना ग्राहकांकडून सदोष बॅटरी जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानेही यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सदोष बॅटरी ग्राहकांकडून जमा करण्यासाठी कंपन्या बॅटरी बायबॅक (Battery Buyback) किंवा डिपॉझिट रिफंडसारख्या योजना सुरू करू शकतात.

कच्चा माल वापरण्याची मुदत
सर्कुलर इकोनॉमी (Circular Economy) वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. यामुळे निरुपयोगी सामान कमी होण्यास मदत होणार असून बॅटरीची किंमतही कमी होईल. सरकारने पुनर्वापरासाठी कच्चा माल वापरण्याची अंतिम मुदतही निश्चित केली आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार असून आदेशाचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर ही समिती दंड आकारेल.