BOB RECRUITMENT 2021 : कमीत कमी सहा महिन्यांचा वर्क Experience आणि परीक्षा न देता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

बँकेतील नोकरीच्या शेधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.

Updated: Apr 21, 2021, 09:14 PM IST
BOB RECRUITMENT 2021 : कमीत कमी सहा महिन्यांचा वर्क Experience आणि परीक्षा न देता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी title=

नवी दिल्ली : बँकेतील नोकरीच्या शेधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. कारण बँक ऑफ बडोदाने मानव संसाधन पदासाठी भरती सुरु केली आहे. यापदासाठी त्यांनी अर्ज मागितला आहे. ज्या उमेदवारांना रिलेशनशिप मॅनेजर आणि इतर पदांसाठी अर्ज करायाचा आहे. त्यानी बँक ऑफ बडोद्याच्या अधिकृत संकेतस्थळावर bankofbaroda.in जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2021 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करावे. बँक ऑफ बडोदा या भर्ती मार्फत 511 पदे भरणार आहेत.

उमेदवार अर्ज करण्यासाठी थेट https://www.bankofbaroda.in/caree.detail htm#tab-18 या लिंकवर क्लिक करून पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच कोणत्याही उमेदवाराला संबंधीत पोस्टसाठी 6 महिन्यांपेक्षा कमी अनुभव असेल तर त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

BOB Recruitment 2021 पदांची माहिती

(Senior Relationship Mariager) वरिष्ठ संबंध मॅनेजर - 407 पदे
(E-Wealth Relationship Manager) ई- वेल्थ रिलेशनशीप मॅनेजर - 50 पदे
(Regional Head) क्षेत्रीय प्रमुख - 44 पदे
(Group Head) ग्रुप हेड - 6 पदे
(Production Hend) प्रोडक्शन हेड - 1 पद
(Operations and Technology) ऑपरेशन आणि टेक्नेलॅाजी - 1 पद
(Digital Sales Manager) डिजिटल सेल्स मॅनेजर - 1 पद
(IT Functional Analyst Manager) आयटी कार्यात्मक विश्लेषक मॅनेजर - 1 पद

निवड प्रक्रिया

ही प्रक्रिया शॅार्य लिस्ट
वैयक्तिक किंवा ग्रुप मुलाखत
इतर दुसऱ्या निवडप्रक्रियेच्या आधारे होईल

अर्ज शुल्क

एससी (SC) / एसटी (ST) / पीडब्ल्यूडी (PWD) आणि सामान्य वर्गासाठी 600/- रुपये
तर, ओबीसीमधील महिलांसाठी 100/- रुपये
पेमेंन्ट फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.