Bank Locker Rule Change | लॉकर वापराच्या नियमात RBI कडून मोठे बदल, जाणून घ्या अन्यथा होऊ शकते अडचण

 तुम्ही तुमचे मौल्यवान दागिने लॉकरमध्ये ठेवले असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. घरात मौल्यवान वस्तू चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता असते. 

Updated: Oct 4, 2021, 11:13 AM IST
Bank Locker Rule Change | लॉकर वापराच्या नियमात RBI कडून मोठे बदल, जाणून घ्या अन्यथा होऊ शकते अडचण title=

मुंबई : तुम्ही तुमचे मौल्यवान दागिने लॉकरमध्ये ठेवले असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. घरात मौल्यवान वस्तू चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक लोक बॅंक लॉकरमध्ये मोल्यवान दागिने आणि इतर वस्तू ठेवतात. परंतु ही सुविधा तुमच्या अडचणी वाढवू शकते. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार एका दीर्घ अवधीपर्यंत तुम्ही आपले लॉकर नाही उघडले तर बँक तुमचे लॉकर उघडू शकते.

बँकांसाठी नवीन दिशानिर्देश
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे सेफ डिपॉजिट लॉकरच्या संबधित सुधारित दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. यानुसार बँकांना लॉकर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर दीर्घ अवधीपर्यंत लॉकर उघडण्यात आले नसेल तर बँका लॉकर उघडू शकते. जरी तुम्ही नियमित स्वरूपात भाडेशुल्क भरीत असाल.

आरबीआयच्या सुधारित नियमांनुसार, लॉकरमधील वस्तू वारसाला देण्यासाठी तसेच पारदर्शक पद्धतीने वस्तूंचे सेटलमेंट करण्यासाठी बँक लॉकर उघडण्यास स्वतंत्र असेल. जर 7 वर्षाच्या अवधीसाठी लॉकर निष्क्रिय आहे. (नियमित स्वरूपात भाडेशुल्क भरीत असला तरी) अशावेळी जनहितार्थ बँक ते लॉकर उघडू शकते. लॉकर उघडण्याआधी आरबीआयने दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.