'या' बॅंकांना मिळणार इतके अनुदान!

सरकारी बॅंकांसाठी सरकारने सुमारे एक लाख कोटींचे पॅकेज जाहिर केले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 25, 2018, 02:01 PM IST
'या' बॅंकांना मिळणार इतके अनुदान! title=

नवी दिल्ली : सरकारी बॅंकांसाठी सरकारने सुमारे एक लाख कोटींचे पॅकेज जाहिर केले आहे. वित्तमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. त्याचबरोबर सरकारी बॅंका बुडू न देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार सरकारी बॅंकांच्या पाठीशी आहे. त्यामुळे लोकांचे पैसे सुरक्षित राहतील, असे देखील त्यांनी सांगितले.

बॅंकेतील तुमचे पैसे सुरक्षित

  • बॅंकेत चुकून काही फ्रॉड झाल्यास ग्राहकांना १० दिवसाच्या आत रक्कम परत केली जाईल.
  • बॅंकांना अकाऊंट ओपन करण्यासाठी अॅप प्रमोट करावे लागेल.
  • खाताधारकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सरकारने सांगितले. 
  • बॅंकांना त्यांच्या सुविधेत सुधारणा करायला हवी. सेवा-सुविधा सोप्या करायला हव्यात.

सरकारने जाहिर केले...

  • सरकारी बॅंकांना ८८,१३९ कोटींचे पॅकेज देण्याचे जाहिर केले आहे.
  • सरकारी बॅंकेत सुधारणा करण्यात येतील.
  • बॅंकांना गरजेनुसार मदत देण्यात येईल.
  • बॅंकांना आपल्या नॉन कोर असेटच्या माध्यमातून पैसे कमवायला हवेत.
  • २५० कोटींपेक्षा अधिक प्रकारच्या लोनवर विशेष लक्ष देण्यात येईल.
  • बॅंकांना काहीच क्षेत्रात फोकस करण्याचा अधिकार.

मोठ्या रकमेच्या लोनवर विशेष लक्ष

  • बॅंकांना SME ची ग्रोथ वाढवण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतील.
  • रिकपिटलायजेशन बॅंकांना त्यांच्या प्रदर्शनावर अवलंबून राहावे लागेल.
  • २५० कोटींहुन अधिक रक्कमेच्या लोनवर विशेष लक्ष देण्यात येईल.
  • मोठ्या कॉर्पोरेट लोनसाठी एक्सपोजर १०% ठेवावे लागेल.

कोणत्या बॅंकेला किती पूंजी मिळेल?

  • स्टेट बॅंक ऑफ इंडिया- ८८०० कोटी रुपये
  • पंजाब नॅशनल बॅंक- ५४७० कोटी रुपये
  • बॅंक ऑफ बडोदा- ५३७५ कोटी रुपये
  • IDBI बॅंक- १०६१० कोटी रुपये
  • बॅंक ऑफ इंडिया- ९२३२ कोटी रुपये
  • युको बॅंक- ६५०७ कोटी रुपये
  • सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया- ५१५८ कोटी रुपये
  • इंडियन ओव्हरसीस बॅंक- ४६९४ कोटी रुपये
  • ओरिंटल बॅंक ऑफ कॉमर्स- ३५७१ कोटी रुपये
  • देना बॅंक- ३०३४ कोटी रुपये
  • बॅंक ऑफ महाराष्ट्र- ३१७३ कोटी रुपये