बजाज इलेक्ट्रिक Chetak ची सप्टेंबरपासून डिलिवरी सुरू होण्याची शक्यता; दोन वेरिएंटमध्ये होणार उपलब्ध

बजाज आपली इलेक्ट्रिक स्कूटर चेतकची डिलिवरी सप्टेंबरमध्ये सुरू करू शकते. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादानंतर कंपनीने एप्रिलमध्ये चेतकची बुकिंग बंद केली होती

Updated: Jun 30, 2021, 05:57 PM IST
बजाज इलेक्ट्रिक Chetak ची सप्टेंबरपासून डिलिवरी सुरू होण्याची शक्यता; दोन वेरिएंटमध्ये होणार उपलब्ध title=

नवी दिल्ली : बजाज आपली इलेक्ट्रिक स्कूटर चेतकची डिलिवरी सप्टेंबरमध्ये सुरू करू शकते. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादानंतर कंपनीने एप्रिलमध्ये चेतकची बुकिंग बंद केली होती. बजाज 2020-21 च्या वार्षिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. बजाजने मोठ्या अवधीनंतर आपली प्रसिद्ध स्कूटर ब्रॅंड  चेतकला इलेक्ट्रिक स्वरूपात समोर आणले आहे. या मॉडेलचे दोन वेरिएंट चेतक अर्बन  आणि चेतक प्रीमियम मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, बजाज ऑटोचे माजी अध्यक्ष राहूल बजाज यांनी मागील वर्षी शेअरधारकांना संबोधित करताना म्हटले होते की, '' 2020 च्या सुरूवातीला जेव्हा चेतकची बुकिंग सुरू झाली होती. तेव्हा कोव्हिड १९ मुळे सप्लाय चैनमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे बुकिंग थांबवण्यात आली होती. त्यानंतर 13 एप्रिल 2021 मध्ये पुन्हा बुकिंग सुरू करण्यात आली. परंतु प्रचंड प्रतिसादामुळे ती ४८ तासात थांबवण्यात आली''.

 बजाज ऑटोने म्हटले की, ''आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच सप्टेंबर दरम्यान इलेक्ट्रिक चेतकची डिलिवरी सुरू होण्याची आशा आहे.''
 
 सिंगल चार्जमध्ये 95 किमीपर्यंत प्रवास
 बजाज ऑटोने म्हटले आहे की,  स्कूटरला IP67 रेटेड हायटेक लीथिएम आर्यन बॅटरी लागली आहे.  स्टॅडर्ड ५ एम्पीअरच्या इलेक्ट्रिक आऊटलेवर सहज चार्ज करता येते. इको मोडवर स्कूटर सिंगल चार्जमध्ये ९५ किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. यामध्ये ऑनबोर्ड इंटेलिजेंस मॅनेजमेंट सिस्टिम आहे. जी चार्जिंग आणि डिस्चार्जिगला कन्ट्रोल करू शकते.