मुंबई : उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद रेल्वे स्थानकात (Moradabad Railway Station) अशी एक घटना घडली की आपल्या आईला वाचविण्यासाठी चिमुरडीने हुशारी दाखवली. त्यामुळे तिच्या आईचा जीव वाचला आहे. रेल्वेच्या सुरक्षा दलाला (Railway Protection Force) बेशुद्ध अवस्थेतील महिलेवर वेळेवर उपचार होण्यासाठी मदत करता आली आणि हे शक्य झाले ते तिच्या दोन वर्षांच्या चिमुकलीमुळे. या महिलेवर उपचाराची गरज होती. मात्र, ती बेशुद्ध होती. आपली आई काहीही बोलत नाही की हालचाल करत नाही, हे मुलीने ओळखले. ती रेल्वेपुलावरुन खाली उतरुन उभी होती. ती खरे तर मदतीसाठी उभी होती. हे तिच्या कृतीतून दिसून आले. पाहा कसे ते? (व्हिडिओ)
मुरादाबाद रेल्वे स्थानकाच्या पुलावर बेशुद्ध आई आणि लहान भावाचा जीव वाचविण्यासाठी एका निष्पाप मुलीने आश्चर्यकारक बुद्धीमत्ता दाखविली आहे. मुलीची आई बेशुद्ध पडली होती आणि तिच्या लहान भाऊ तिला बिलगला होता. लहान मुलीने समजूतदारपणा दाखवत ही चिमुरडी रेल्वे पुलावरून खाली आली. रेल्वे सुरक्षा बल (Railway Protection Force-RPF) आणि जीआरपीच्या महिला पोलिसांना तिने हाताने इशारा करत ते तिच्या आईकडे गेले. या चिमुरडीमुळे तिच्या आईचे प्राण वाचू शकले.
मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असलेल्या आरपीएफच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केजीके महाविद्यालयाकडे जाणाऱ्या पुलाच्या पायर्यांवर नजर टाकली, तिथे एक दोन वर्षांची मुलगी उभी होती. ती मुलगी तिथे उपस्थित असलेल्या महिला शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) जवानांकडे पहात होती. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याला मुलगी त्यांच्याशी काहीतरी बोलू इच्छित असल्याचे वाटले.
जेव्हा तिने मुलीला विचारले तेव्हा, तिला इशारा करून काहीतरी सांगायचे होते. परंतु जेव्हा महिला पोलीस कर्मचाऱ्याला काहीच समजले नाही. तेव्हा तिने त्यांना आपल्याबरोबर येण्याचा हाताने इशारा केला. रेल्वे पुलावरुन येताना महिला पोलिसांना तिची बेशुद्ध आई आणि लहान भाऊ आईला बिलगलेला दिसला. त्यावेळी ही महिला बेशुद्ध असल्याचे दिसून आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी या बेशुद्ध महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यासाठी रूग्णवाहिका मागविली आणि तिला दाखल केले.
जिल्हा रुग्णालयात आपात्कालीन विभागातील डॉक्टर शोभित यांनी सांगितले की, रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत एका महिलेला दाखल केले आहे. तिला दोन मुलं आहेत. सध्या ही महिला बेशुद्ध अवस्थेत आहे. तिच्याबद्दल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. सध्या ही महिला धोक्यातून बाहेर आली आहे.