नवी दिल्ली : अयोध्या विवादात्मक जागेवर अखेर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. विवादात्मक जागा ही राम मंदिरासाठी देण्यात आली असून, मशीदीसाठी अयोध्येतच पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्य़ात आले आहेत.
11.20 - राम मंदिर बांधण्यासाठी 3 महिन्यात रुपरेखा तयार करण्याचे कोर्टाचे आदेश
11.15 - राम मंदिर बनवण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश
11.12 - रामजन्मभूमी न्यासला वाद असलेली जमीन देण्याचे आदेश
11.10 - मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा देण्याचे आदेश
Supreme Court orders that Central Govt within 3-4 months formulate scheme for setting up of trust and hand over the disputed site to it for construction of temple at the site and a suitable alternative plot of land measuring 5 acres at Ayodhya will be given to Sunni Wakf Board. pic.twitter.com/VgkYe1oUuN
— ANI (@ANI) November 9, 2019
11.08 - सुन्नी बोर्डाला अयोध्येतच दुसरी जागा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.06 - मुस्लीम वर्गाला दुसरी जागा देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.05 - रामाचा जन्म त्याच जागी झाला होता याचे पुरावे - कोर्ट
11.04 - 1885 पासून हिंदू चौथाऱ्यावर पूजा करत होते.
11.03 - हिंदू सीता स्वयंपाकघरात पूजा करत होते. - कोर्ट
11.01 - इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज वाचली जात होती असा पुरावा नाही - कोर्ट
11.00 - मुस्लीम पक्ष जमिनीवर एकाधिकार सिद्ध नाही करु शकला.
10.55 - आस्था आणि विश्वासच्या आधारावर नाही तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल - कोर्ट
10.52 - 12 व्या आणि 16 व्या शतकात या जागी काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही - कोर्ट
10.50 - मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही- कोर्ट
10.49 - एएसआयच्या रिपोर्टनुसार मशीदच्या जागी आधी मंदिर होतं असं देखील निर्णयात म्हटलं गेल्याचं कळतं आहे.
10.47 - आस्था आणि विश्वासवर कोणताही वाद नाही होऊ शकत - कोर्ट
10.46 - जमीन विवादाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय दिला जाईल - कोर्ट
10.45 - रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही. - कोर्ट
10.42 - बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसल्याचं कोर्टाने निर्णयात म्हटलं आहे. याचा अर्थ बाबरी मशीदच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं. असं देखील सुनावणीत म्हटलं असल्याचं कळतं आहे.
10.38 - निर्मोही आखाड्याचा दावा ही कोर्टाने फेटाळला आला आहे.
10.31 - शिय्या वफ्फ बोर्डाची याचिका फेटाळण्यात आली आहे.
Chief Justice of India Ranjan Gogoi: We have dismissed the Special Leave Petition(SLP) filed by Shia Waqf Board challenging the order of 1946 Faizabad Court #AyodhyaJudgment pic.twitter.com/hbwibSA3ov
— ANI (@ANI) November 9, 2019
10.28 - अयोध्या निकालाच्या निर्णयाची प्रत सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे.
10.27 - केंद्रीय होम सेक्रेटरी अजय भल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले आहेत. सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक
Delhi: Union Home Secretary Ajay Bhalla arrives at Home Minister Amit Shah's residence for high level security meeting https://t.co/IKI6ag99xe pic.twitter.com/OZab6OUFf8
— ANI (@ANI) November 9, 2019
10.25 - सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अब्दूल नजीर, अशोक भूषण हे खंडपीठ आज या प्रकरणात निकाल देणार आहेत. सरन्यायाधीशांसह सर्व न्यायमूर्ती निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेत. काही वेळातच निकाल येईल अशी अपेक्षा आहे.
10.20 - सरन्यायाधीश रंजन गोगाई कोर्टात पोहोचले.
9.50 - अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे पाचही न्यायाधीश कोर्टात दाखल.
9.45 - सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या कोर्टाबाहेर वकिलांची गर्दी.
Supreme Court: Lawyers gather outside Chief Justice of India Ranjan Gogoi's court. Five-judge SC bench to deliver verdict in #Ayodhya land case at 1030 am. #Delhi pic.twitter.com/y3mxfOwhEh
— ANI (@ANI) November 9, 2019
9.35 - अयोध्येच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टात वकील पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे देखील सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत.
Delhi: Security personnel outside Supreme Court ahead of verdict in #Ayodhya land case; Section 144 is imposed in the area pic.twitter.com/AAJobFb9KR
— ANI (@ANI) November 9, 2019
9.15 - सकाळी 9.30 वाजता न्यायाधीश कोर्टात पोहोचतील. त्यानंतर चीफ जस्टिस रंजन गोगोई यांच्यासह इतर न्यायाधीश कोर्टात येतील. 10.30 वाजता पाचही न्यायाधीश 5 बंद पाकिटं फोडतील. ज्यामध्य़े अयोध्येचा निकाल असेल. त्यानंतर अयोध्येचा निकाल जाहीर केला जाईल.
9.00 - निर्मोही अखाड्याचे वकील तरुणजीत वर्मा यांनी म्हटलं की, '491 वर्षानंतर येणारा हा निर्णय भारताला जोडण्याचं काम करणार आहे. आजचा हा निकाल संपूर्ण वाद संपवणार आहे.'
8.00 - अयोध्या प्रकरणावर 30 सप्टेंबर 2010 ला इलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला होता. या प्रकरणात कोर्टाने 2.77 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, निर्माही अखाडा आणि रामलला या तिघांमध्ये वाटली होती. हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर मोठी सुनावणी झाल्यानंतर आज यावर सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय देणार आहे.