Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. शनिवारी राममंदिरात रामललाच्या अभिषेकासाठी (Ram Mandir Pran Pratishtha) सुरू असलेल्या विधींच्या मालिकेत नव-दिव्य मंदिरात सिंहासनापासून जमिनीपर्यंत देशभरातून आणलेल्या नद्यांचे पवित्र पाणी शिंपडून 81 चांदीच्या कलशांचे शुद्धीकर करण्यात आले. यानंतर आज (21 जानेवारी) रविवारी संध्याकाळी राजाधिराज म्हणून मंदिरात प्रवेश करणार आहेत.
उद्या म्हणजेच सोमवारी , राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. तर देशातही उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे. उद्या 84 सेंकदाचा हा मुहूर्त असणार आहे. राम मंदिरात शुक्रवारी रामलल्लाची मूर्तीची विराजमान करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर राम मूर्तीचे फोटो देखील व्हायरल झाले. श्रीरामा मूर्तीचा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की, मूर्तीचा रंग काळा का आहे?
राम मंदिरात विराजमान असलेली रामाची मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आली असून ती बालस्वरुपात आहे. रामललाची मूर्ती एकाच दगडापासून बनवली जाते. या काळ्या दगडाला कृष्ण शिला असेही म्हणतात. त्यामुळे रामललाची मूर्ती गडद काळ्या रंगाची आहे. ज्या दगडातून रामललाची मूर्ती बनवली आहे त्यात अनेक गुण आहेत.
रामललाच्या मूर्तीच्या बांधकामात हा दगड वापरण्यामागील एक कारण म्हणजे रामलल्लावर दुधाचा अभिषेक केला जाणार आहे. तेव्हा दगडामुळे दुधाच्या गुणवत्तेत कोणताही बदल होणार नाही. दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, मूर्ती हजार वर्षांहून अधिक काळ तशीच राहू शकते. तसेच वाल्मिकींच्या रामायणात भगवान रामाचे रुप काळ्या रंगात वर्णन केले आहे. त्यामुळे रामललाच्या मूर्तीचा रंग काळा असण्याचे हेही एक कारण आहे. तसेच रामललाची पूजा श्यामल रुपातच करणार.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटनीस चंपत राय म्हणाले की, भगवान श्री रामललाची मूर्ती पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात आहे. ही मूर्ती 51 इंच उंच असून रामललाची मूर्ती काळ्या रंगाची असल्याचे त्यांनी सांगितले. रामलल्लाचा मूर्ती अवतारही दाखवला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. जगभरातील मंदिरांमध्ये रोषणाई केली जाणार आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजित केले जात हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.