अंबानी किंवा टाटा नाही तर 'ही' व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा नुकतीच पार पडली. अयोध्येसह संपूर्ण देश राम रंगात रंगलेला दिसतो. राम मंदिराच्या निर्माणाकरता अनेकांनी दान केलंय. अशावेळी एक व्यक्ती मात्र अतिशय दानशूर ठरली आहे. ज्यांनी अगदी गडगंज श्रीमंत असलेल्या अंबानी आणि टाटांना देखील मागे टाकलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 22, 2024, 12:39 PM IST
अंबानी किंवा टाटा नाही तर 'ही' व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर  title=

अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे. 

कथावाचक  मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ रामायणाचा प्रचार करणाऱ्या बापूंनी एकूण 18.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 

15 दिवसांत 11.3 कोटी जमा झाले

या मदतीच्या रकमेत भारताकडून 11.30 कोटी रुपये, ब्रिटन आणि युरोपमधून 3.21 कोटी रुपये आणि अमेरिका, कॅनडा आणि इतर अनेक देशांकडून 4.10 कोटी रुपयांचे योगदान आहे. मोरारी बापूंनी सांगितले की, कोरोनाच्या काळात आम्ही आमच्या भक्तांकडून अवघ्या 15 दिवसांत सुमारे 11.3 कोटी रुपये जमा केले होते आणि ते रामजन्मभूमी ट्रस्टकडे सुपूर्द केले होते. 

राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत काय म्हणाले बापू?

64 वर्षांच्या तपश्चर्येनंतर राम काज करत असताना आदरणीय मोरारी बापूंनी राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह दाखवला आणि सांगितले की, राम मंदिर बांधल्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला आहे. हल्ली माझ्या नसांमधून आनंद वाहत आहे. माझे हृदय आनंदाने धडधडत आहे. ते म्हणाले की, प्रभू राम कोणत्याही एका पंथाचे किंवा देशाचे नाहीत, ते संपूर्ण जगाचे आहेत.

24 फेब्रुवारीपासून अयोध्येत बापूंची कथा

या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा मी कथा करेन, तेव्हा थकबाकीची रक्कम रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला दिली जाईल. एकूण देणगी 18.6 कोटी रुपये आहे. मोरारी बापू यावर्षी 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत अयोध्येत रामकथा करणार आहेत. अयोध्येच्या नवीन राम मंदिरात मोरारी बापू वेद, वाल्मिकी रामायण आणि गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानस या तीन पवित्र ग्रंथांचे पुन्हा नव्याने पठण करतील. स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, वेद, वाल्मिकींचे रामायण आणि गोस्वामी तुलसीदासांचे राम चरित मानस अयोध्येतील राम मंदिरात ठेवावेत, असे मला वाटते.