प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री

Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 23, 2024, 05:15 PM IST
प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री title=

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Pran Pratistha) सोहळा 22 जानेवारीला पार पडला. त्यानंतर 23 तारखेपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय. देशभरातून भाविक रामाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत सामान्यांना रामाचं दर्शन घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी केवळ 2 तासात तब्बल 1 लाख 70 हजार भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. अजूनही अयोध्येतील रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहीलं असून वाढत्या गर्दीमुळे मंदिरातील एक्झिट गेट बदलण्याची वेळ पोलिसांवर आलीये.

करोडो रुपयांची उलाढाल
देशाच्या अर्थव्यवस्थेत एक नवा अध्याय जोडला गेला आहे. भविष्यात हा व्यवसाय आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशातील व्यापारी संघटना असलेल्या  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) दिलेल्या माहितीनुसार  श्री राम मंदिरामुळे देशात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय झाला आहे. यामध्ये एकट्या दिल्लीत सुमारे 25 हजार कोटी रुपये तर उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला.

कॅचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया आणि प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा आणि भक्तीमुळे देशाच्या बाजारपेठेत व्यवसायाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा सर्व पैसा छोटे व्यापारी आणि छोटे उद्योजक यांच्या माध्यमातून आला आहे.  

मोठ्या प्रमाणावर रोजगार
श्री राम मंदिरामुळे देशात व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याविषयावर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने नवी दिल्लीत लवकरच एक सेमिनार आयोजित केला जाणार आहे. हर शहर अयोध्या, हर घर अयोध्या या राष्टाीय अभियानाअंतर्गत देशात 1 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात दीड लाखाहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यापैकी 22 तारखेला सर्वाधिक एक लाख कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 

या वस्तूंची सर्वाधिक विक्री
या दिवसात राम मंदिराचं मॉडेल, माळा, लटकन, बांगड्या, टिकल्या, कडं, राम ध्वज, राम पताका, राम टोपी, राम पेंटिंग, राम दरबारातील चित्र, श्री रामाचे फोटो आणि मूर्ती यांची सर्वाधिक विक्री झाली. याशिवाय करोडो रुपयांच्या मिठाई आणि ड्रायफ्रुट्सची विक्री झाली. ब्राम्हण आणि पंडितांच्या उत्पन्नातही या काळात मोठी वाढ झाली. करोडो रुपयांचे फटाके, मातीचे दिवे, रांगोळी आणि इतर वस्तूंचीीह मोट्या प्रमाणावर विक्री झाली. येत्या काळात श्रीारामाची मूर्ती भेट म्हणून देण्याचं प्रमाणही वाढणार आहे. 

1 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात देशभरात 2 हजार शोभायात्रा, 5 हजाराहून अधिक श्री राम पेरी, 1000 हून अधिक श्री राम संवाद कार्यक्रम, 2500 हून अधिक श्री राम भजन आणि श्री राम गीतांचे कार्यक्र आयोजित करण्यात आले होते.