VIDEO : स्पितीच्या खोऱ्यात सफेद वादळ, पाहा अंगावर काटा आणणारा 'हा' व्हिडिओ

अनेक गावांमध्ये हिमस्खलन 

Updated: Mar 15, 2019, 11:57 AM IST
VIDEO : स्पितीच्या खोऱ्यात सफेद वादळ, पाहा अंगावर काटा आणणारा 'हा' व्हिडिओ  title=

नवी दिल्ली : तापमानाचा पारा आणि एकंदर त्याचे हवामानावर होणारे परिणाम पाहता उत्तर भारतात असणाऱी थंडीची लाट काही काही कमी झालेली नाही. दर दिवसाआड जम्मू- काश्मीरपासून ते हिमाचल प्रदेशपर्यंत प्रत्येक ठिकाणी बर्फवृष्टी सुरुच आहे. तापमानात होणारी हीच घट पाहता, परिणामी लाहौल आणि स्पितीच्या खोऱ्यात सफेद वादळ आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या भागातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

अतिथंडी आणि बर्फवृष्टीमुळे स्पितीच्या खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. ज्यामुळे सध्या स्थानिक प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या स्पितीच्या याच खोऱ्यातील एक व्हिडिओ अनेकांच्या अंगावर काटा उभा करत आहे. ज्यामध्ये तांदी या गावात आलेलं हिमवादळ पाहता सद्यस्थिती नेमकी काय असेल याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

हिमवादळाचा तडाखा बसलेल्या या गावातील स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जवळपास गेल्या महिनाभरापासून उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. थंडीचं वाढतं प्रमाण पाहता अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीमुळे दळणवळणाच्या सोयीसुविधांवरही परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिमला, मनाली या भागांसोबतच उत्तराखंडमध्येही तापमानाच्या पाऱ्याने उणेचा आकडा गाठला आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढल्यामुळे देशातही त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळ आता हे हिमवादळ नेमकं शांत कधी होणार याकडेच अनेक स्थानिकांचं लक्ष लागलेलं आहे.