'भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवरचे ते हल्ले पूर्वनियोजीत'

केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित आहेत असा आरोप आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. 

Updated: Aug 6, 2017, 05:54 PM IST
'भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवरचे ते हल्ले पूर्वनियोजीत' title=

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित आहेत असा आरोप आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे.

इतकंच नाही तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि इथली परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असंही जेटली यांनी म्हटलं आहे.

वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावं आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशीही मागणी जेटली यांनी केली आहे. केरळमध्ये आरएसएस कार्यकर्ता राजेश याची गेल्या आठवड्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राजेशच्या कुटुंबियांची  भेट घेऊन सांत्वन केलं. या हत्येच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सीपीएम यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.