Atique Ahmed shot dead : आत्ताची मोठी बातमी! अतिक अहमद आणि अशरफना गोळ्या झाडून संपवलं

Atique Ahmed Murder: माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज (UP Crime News) येथे मेडिकलसाठी नेत असताना गोळ्या घालून ही हत्या करण्यात आली आहे.

Updated: Apr 16, 2023, 10:45 AM IST
Atique Ahmed shot dead : आत्ताची मोठी बातमी! अतिक अहमद आणि अशरफना गोळ्या झाडून संपवलं  title=
Atiq Ahmed,Ashraf Ahmed,UP crime News

UP crime News : माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज येथे मेडिकलसाठी नेत असताना गोळ्या घालून ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांच्या वेशात आरोपी आले होते. त्यानंतर आता पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. (Atiq Ahmed and his brother Ashraf were shot dead UP crime News)

पोलिस दोघांनाही प्रयागराजच्या मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. पण रस्त्यामध्ये गोळीबार झाला, त्यात दोन्ही भाऊ जखमी झाले, त्यानंतर आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गँगस्टर, माफिया डॉन आणि राजकारणी अतीक अहमदचा मुलगा असद पोलीस चकमकीत ठार झाला होता. उमेश पाल हत्या प्रकरणी तो फरार होता. चकमकीत त्याचा साथीदारही मारला गेला होता. त्यानंतर आता अतीक अहमदची देखील हत्या करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

अतीकचे वकील विजय मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतीक आणि अशरफ यांनाच गोळ्या लागल्या आहेत. आज पूर्वीपेक्षा कमी पोलीस बंदोबस्त होता. पत्रकार जिथे उभे होते तिथे जमावाकडून अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. घटना घडली त्यावेळी अतिक आणि अश्रफ यांचे वकील काही अंतरावर उभे होते. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पाहा Video -

प्रकरण काय होतं? 

बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या खून खटल्यातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचार्‍यांची यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिक हा आरोपी होता.

आणखी वाचा - गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलिसांकडून एन्काऊंटर

दरम्यान, उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी नुकतीच 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यासाठी गुजरातमधील साबरमती कारागृहातून सुमारे पंधरवड्यात आतीक अहमदला दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशातील नैनी मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलं होतं.