आसाम-मिझोरम सीमा वादावर तोडगा निघणार, पॅरामिलिट्री होणार तैनात

आसाम आणि मिझोरम दरम्यान सीमा संघर्ष सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी बैठक बोलवली होती. 

Updated: Jul 28, 2021, 09:53 PM IST
आसाम-मिझोरम सीमा वादावर तोडगा निघणार, पॅरामिलिट्री होणार तैनात title=

नवी दिल्ली : आसाम आणि मिझोरम दरम्यान सीमा संघर्ष सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी बैठक बोलवली होती. बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांसह आणि पोलीस प्रमुखांचा समावेश होता. बैठकीत दोन्ही राज्यांत चर्चतून मुद्दा सोडवण्याबाबत एकमत झाले. तसेच वादग्रस्त ठिकाणापासून दोन्ही राज्यांचे पोलीस मागे जातील आणि या ठिकाणी पॅरामिलिट्री फोर्सची तैनाती केली जाईल.

केंद्र सरकार चिंतित

गृहसचिव अजय भल्ला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीत आसामचे मुख्य सचिव जिष्णु बरुआ आणि पोलीस महानिर्देशक भास्कर ज्योति महंत आणि मिझोरामचे चीफ सेक्रेटरी  लालनुनमाविया चुआंगो आणि DGP एसबीके सिंह यांचा सहभाग होता. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'केंद्र सरकार आसाम-मिझोराम सीमा विवादामुळे चिंतित आहे, ज्या कारणास्तव हिंसाचार झाला आणि सहा लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे शांती स्थापित करणे आणि समाधान शोधणे. हे महत्त्वाचे आहे.'

अधिकाऱ्याने सांगितलं की, सीआरपीएफचे महानिर्देशक देखील बैठकीत उपस्थित होते. जेथे तणाव आहे तेथे अर्धसैनिक दलाचे जवान तैनात आहेत. मिझोराम पोलिसांच्या एका टीमने आसामच्या अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. ज्यामध्ये आसाम पोलिसांचे 5 कर्मचारी आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये 1 SP सह 80 हून अधिक जण जखमी झाले होते. 

आसामच्या बराक घाटी जिल्ह्यातील कछार, करीमगंज आणि हायलाकांडी तर मिझोरामचे तीन जिल्हे आइजोल, कोलासिब आणि मामितसह 164 किलोमीटर पर्यंत सीमा लागून आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सीमा विवाद सोडवण्यासाठी चर्चा केली होती. त्यानंतर 2 दिवसांनी ही घटना घडली होती.