गर्लफ्रेंडचा लग्नास नकार, तरूणाने Facebook Live करत आयुष्य संपवल

Shocking Story : तरूणाचे नाव जयदीप रॉय असे होते. तो सिलचरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यांचे कुटुंब जवळच कलाम येथे राहत होते.त्याच एका मुलीवर प्रेम होते. या मुलीला त्याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने लग्नास नकार दिल्याने त्याने फेसबूक लाईव्हवर (Facebook Live) आत्महत्या केली होती.

Updated: Dec 30, 2022, 08:12 PM IST
 गर्लफ्रेंडचा लग्नास नकार, तरूणाने Facebook Live करत आयुष्य संपवल title=

Shocking Story : गर्लफ्रेंडने (Girlfriend) लग्नास नकार दिल्याने एका 27 वर्षीय तरूणाने (Boy) फेसबूक लाईव्ह (Facebook Live) करत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेने तरूणाच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. तरूणाच्या कुटूंबियांनी आता त्याच्या गर्लफ्रेंडवर हत्येचा आरोप केला आहे. तसेच पोलिसात (Police Complaint) तक्रार देखील दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. 

कुटूंबियांचा आधार हरपला

तरूणाचे नाव जयदीप रॉय असे होते. तो सिलचरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यांचे कुटुंब जवळच कलाम येथे राहत होते.त्याच एका मुलीवर प्रेम होते. या मुलीला त्याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने लग्नास नकार दिल्याने त्याने फेसबूक लाईव्हवर (Facebook Live) आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे जयदीप हा वैद्यकीय विक्री व्यावसायिक होता. त्यांच्या खाद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी होती. घरात तो एकटाच कमावता पुरुष होता. मात्र त्याच्या निधनाने आता कुटूंबियांचा आधारवड गेला आहे. 

फेसबूक लाईव्हमध्ये काय म्हणाला?

तरूणीने लग्नास नकार दिल्यानंतर जयदीपने फेसबूक लाईव्ह (Facebook Live) केले. या लाईव्हमध्ये तो म्हणाला की,"मी लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता, पण सर्वांसमोर तिने नकार दिला. यानंतर तिच्या काकाने आमच्या नात्यावर मला मारण्याची धमकी दिली होती, असे त्याने सांगितले. माझ्यामुळे तिला कोणत्याही प्रकारच्या यातना सहन कराव्या लागू नयेत म्हणून आता मी हे जग सोडून जात आहे,असे त्याने यावेळी म्हटले. 

'मी माझी आई, काका, काकू, बहीण, मोठा भाऊ, भाची यांची माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो, पण मी माझ्या मैत्रिणीवर जास्त प्रेम करतो आणि मी तिच्याशिवाय जगू शकत नाही, असे म्हणत जयदीपने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.  

पोलिसात तक्रार 

जयदीपच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ रुपम याने सिलचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भावाच्या मृत्यूच्या चार दिवसानंतर त्याने तरूणीच्या कुटुंबाला जबाबदार धरले. उशिरा तक्रार करण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आणि भावाच्या मृत्यूने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले. 

दरम्यान या घटनेत पोलीस कसून तपास करत आहे. आता या घटनेत गर्लफ्रेंडला (Girlfriend) अटक होते का हे पाहावे लागणार आहे.