Indore vs Bhopal, Ashneer Grover : भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि गुंतवणूकदार, तसचे फिनटेक कंपनी 'भारत पे'चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंदौरमधील एका टॉक शोमध्ये बोलताना अशनीर ग्रोव्हर यांनी वादग्रस्त वक्तव्य (Indore vs Bhopal) केलं होतं. त्यानंतर इंदुर शहरात त्यांचे पुतळे जाळण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना इंदुरमध्ये येऊन दाखवा, असं आव्हान देखील त्यांना देण्यात आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अशनीर ग्रोवर (Ashneer Grover Controversy) यांनी ट्विट करत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि इंदुरच्या लोकांची माफी देखील मागितली आहे.
इंदुरकरांची मी माफी मागतो. हे शहर आणि इथंली माणसं अप्रतिम आहेत, पण सगळीकडे नेत्यांना चैन नाही. भोपाळ विरुद्ध इंदुरच्या गंमतीने बोलल्या गेलेल्या प्रकरणावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मी कोणत्याही नेत्याची माफी मागणार नाही. कधीच नाही. मग तो कोणताही पक्ष असो, असं अशनीर ग्रोवर म्हणाले आहेत. संभाषणात चेष्टेने केलेल्या विधानावरून अनावश्यक राजकारण केले जातंय. इंदुरची लोकं भाळी नाहीत. ती हुशार आहेत, त्यांना फरक पडत नाही. जिथं काहीही नाही तिथं समस्या निर्माण करू नका. हे निवडणुकीचे वर्ष असू शकतं, पण लोक हुशार आहेत. माझी इच्छा असेल तेव्हा मी इंदूरला येईन, मला पाहिजे तितक्या वेळा येईल, असं अशनीर ग्रोवर यांनी ठणकावून सांगितलं. भोपाळ हे केवळ खासदारांचेच नाही, तर भारतातील सर्वोत्तम शहर आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या मतावर कायम असल्याचं दाखवून दिलंय.
मी तीन-चार वर्षांपासून ऐकत आहे की इंदूर एक स्वच्छ शहर आहे. मात्र, हे सर्वेक्षण विकत गेलं होतं. स्वच्छतेमध्ये, केवळ चिप्सचे पॅकेटच नव्हे तर मोडतोड आकडे देखील मोजले जातात. सर्वत्र बांधकामं सुरू आहेत. घाणेरडे आहे असे मी म्हणत नाही, पण मला वैयक्तिकरित्या कोणी विचारले तर मी भोपाळला चांगले समजतो, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर मोठा वाद पेटल्याचं दिसून आलं होतं.
Sorry. Not Sorry !
Sorry to Indore. You’ve got great people and city. But politicians everywhere have got no chill ! Unnecessary politics being made out of a statement made in jest in a playful conversation on Bhopal vs Indore. Where the audience had fun - no offence was meant.… pic.twitter.com/OGxZMu4yV1
— Ashneer Grover (@Ashneer_Grover) September 11, 2023
दरम्यान, शार्क टँक या शोमुळे अशनीर ग्रोवर यांना प्रसिद्धी मिळाली होती. शार्क टँक इंडिया कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक व्यवसायाच्या उत्तम कल्पना घेऊन इथं येतात.जर त्या कल्पना परीक्षकांना आवडल्या तर ते त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करतात. या व्यावसायिकांमध्ये अशनीर ग्रोवर देखील परीक्षक म्हणून होते. त्यानंतर त्यांचे अनेक मोटिव्हेशनल व्हिडीओ समोर आले आहे.