India China Troops clash: चीनची भारताविरुद्ध कुरापत, सीमेवर तणाव अन् ओवैसी भडकले, थेट मोदींना सवाल!

Asaduddin Owaisi On India China Troops Clash:  अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आलंय. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झालेत. त्यावरून ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

Updated: Dec 12, 2022, 09:30 PM IST
India China Troops clash: चीनची भारताविरुद्ध कुरापत, सीमेवर तणाव अन् ओवैसी भडकले, थेट मोदींना सवाल! title=
India China Troops clash

India, China Troops Clash Near LAC In Arunachal: भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. तवांग सेक्टरमध्ये झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी (Soldiers injured after clash) झाल्याची माहिती समोर आली होती. काही जखमी जवानांना गुवाहाटीच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे.

दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या आत्तापर्यंत 16 फेऱ्या झाल्या आहेत. अलीकडेच जुलै 2022 मध्ये, कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 16 वी फेरी झाली. 12 तासांहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेदरम्यान भारताने पूर्व लडाखमधील वादग्रस्त भागातून लष्कर पूर्णपणे मागे घेण्यासाठी पुन्हा चीनवर दबाव आणला होता. त्यानंतर आता पुन्हा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. 

अशातच आता चीन सीमेवरून (India China border) राज्यातील विरोधकांनी सरकारला खडा सवाल विचारला आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विट करत मोदी सरकारला (Central Govt) प्रश्न विचारला आहे. 

काय म्हणाले ओवैसी?

अरुणाचल प्रदेशातून (AP) येणारे अहवाल चिंताजनक आणि अर्लट करणारे आहेत. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली अन् आपल्या सरकारने देशाला अनेक दिवस अंधारात ठेवलं आहे. अधिवेशन सुरू असताना संसदेला का कळवलं नाही?, असा सवाल ओवैसी (Asaduddin Owaisi On India China Troops Clash) यांनी विचारला आहे.

आणखी वाचा - Breaking News : भारत-चीन सीमेवर झटापट;  20 ते 30 सैनिक जखमी

दरम्यान, जुलै 2022 मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात बाली येथे झालेल्या चर्चेत पूर्व लडाखशी संबंधित वादाचा मुद्दा ठळकपणे चर्चेत आला होता. G-20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर बाली येथे तासाभराच्या बैठकीत जयशंकर यांनी यी यांना पूर्व लडाखमधील सर्व प्रलंबित समस्यांचं लवकर निराकरण करण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता भारताला G-20 परिषदेचं यजमानपद मिळाल्यामुळे चीनच्या नागपुड्या फुगल्याचं पहायला मिळतंय.