३७० अनुच्छेद रद्द : काश्मीर खोऱ्यात समस्या कायम - काँग्रेस

जम्मू काश्मिरमध्ये ३७० अनुच्छेद रद्द करण्याच्या निर्णयाला आज १०० दिवस पूर्ण झाले. याबाबत राज्यसभेत आज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये आजही समस्या आहे तशाच असल्याचे म्हटले आहे. 

Updated: Nov 20, 2019, 06:05 PM IST
३७० अनुच्छेद रद्द : काश्मीर खोऱ्यात समस्या कायम - काँग्रेस title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमध्ये ३७० अनुच्छेद रद्द करण्याच्या निर्णयाला आज १०० दिवस पूर्ण झाले. याबाबत राज्यसभेत आज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये आजही समस्या आहे तशाच असल्याचे म्हटले आहे. काश्मिरमध्ये इंटरनेट सेवा  बंद आहे, शाळेत मुलांची पटसंख्या कमी आहे, दहशतीचे वातावरण कायम असल्याचे आजाद यांनी म्हटले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर देत काश्मिरमधील परिस्थितीत निश्चितच सुधारणा असल्याचे सांगितले.  

काँग्रेसच्या प्रश्नाला केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारत आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. दरम्यान, योग्यवेळी इंटरनेट सेवा सुरू करणार आहोत, असे जम्मू - काश्मीरच्या मुद्यावर काँग्रेसच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले. 

जम्मू-काश्मीरच्या ताज्या परिस्थितीविषयी माहिती देताना गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी अनुच्छेद ३७० काढून टाकल्यापासून पोलिसांच्या गोळीबारात कोणाचाही मृत्यू झाला नाही. गोष्टी सतत सुधारत असतात. कोणत्याही पोलीस ठाण्यात कर्फ्यू नाही. औषधांची कमतरता नाही. सर्व शाळा खुल्या आहेत. सर्व रुग्णालये खुली आहेत. इंटरनेट सेवा लवकरच पुनर्संचयित करावीत परंतु स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा लागेल. काश्मीरमधील सर्व कार्यालये खुली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दगड फेकीच्या घटना कमी झाल्या आहेत.