राजस्थान : येथील चुरू जिल्ह्यातील एकाच गावातील ८० गावातील गायींचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. अचानक ८० गायींचा मृत्यू झाल्याची बाब कळताच पशुसंवर्धन आणि वैद्यकीय विभागाची पथके घटना स्थळी दाखल होवून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सरदारशहरचे तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे. शिवाय गायींना चाऱ्यातून विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता गायींचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असं देखील सांगण्यात येत आहे.
Around 80 cows have died at a cow shelter in Churu district's Bilyoobas village due to unknown reason. Matter is being investigated to ascertain if deaths were due to food poisoning, any disease or other reason: Kutendra Kanwar, Sardarshahar Tehsildar #Rajasthan
(21.11.2020) pic.twitter.com/NMJ7kGyCgG
— ANI (@ANI) November 22, 2020
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, चुरू जिल्ह्यातील एका गावामध्ये जवळपास ८० गायींचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सरदारशहरचे तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे.
गायींचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे, की यामागे आणखी वेगळे कारण आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचं देखील तहसीलदारांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळपासून गायींची प्रकृती खालावत होती. यामधील काही गायी आजारी असून काहींची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकारी डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले आहे.