प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा

Updated: Jan 25, 2020, 10:20 PM IST
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा title=

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ जणांना पद्म विभूषण, १६ जणांना पद्म भूषण तर ११८ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १२ पद्मश्रींचा समावेश आहे. सुषमा स्वराज, अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस या दिवंगत नेत्यांना पद्मविभूषण, तर मनोहर पर्रिकरांना पद्मभूषण जाहीर झालाय. ख्यातनाम उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण देण्यात येणाराय. 

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, हिवरेबाजारचे सुपर सरपंच पोपटराव पवार आणि बिजमाता राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय.

पोपटराव पवार यांना जलक्रांतीतल्या योगदानासाठी ही पुरस्कार जाहीर झालाय. तर बिजमाता राहिबाई पोपेरे यांना सेंद्रीय शेती आणि बिजसंवर्धनासाठी पुरस्कार जाहीर झालाय.

याआधीच्या सरकारने दखल घेतली नव्हती. या सरकारने दखल घेत हा पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल सुरेश वाडकर यांनी आभार मानले आहेत.