व्हिडिओ : प्रेग्नेंट महिलेस खांद्यावरून नेलं हॉस्पीटलला, वाटेतच प्रसूती

 प्रग्नेंट महिलेला प्रसूतीसाठी खांद्यावरून हॉस्पीटलला नेण्याची वेळ इथल्या गावकऱ्यावंर आली. 

Updated: Sep 7, 2018, 12:30 PM IST
व्हिडिओ : प्रेग्नेंट महिलेस खांद्यावरून नेलं हॉस्पीटलला, वाटेतच प्रसूती title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने सर्वच क्षेत्रात खूप मोठी भरारी घेतली. तंत्रज्ञानापासून अवकाशापर्यंत आपण झेप घेतली. पण आपल्या अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी आरोग्यासंदर्भात गंभीर प्रश्न उभे राहतात. आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक वृत्त समोर येतंय. प्रग्नेंट महिलेला प्रसूतीसाठी खांद्यावरून हॉस्पीटलला नेण्याची वेळ इथल्या गावकऱ्यावंर आली. हा फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलायं. 

अर्ध्या रस्त्यात प्रसूती 

आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात रस्त्याच्या असुविधेमुळे अजूनही गावकऱ्यांना मोठ्या त्रासाला समोरं जाव लागंतयं. एका प्रेग्नेंट महिलेला इलाजासाठी तिचा नातेवाईक पुरूष आपल्या खांद्यावर घेऊन पायी जात होता. गावापासून 7 किमी दूर हॉस्पीटल होतं. पण रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला.

यानंतर त्यांना अर्ध्या रस्त्यातून घरी परताव लागंल. आई आणि बाळ दोघेही सुरक्षीत असले तरी गंभीर समस्येकडे दुर्लक करुन चालणार नाही. वर्षानुवर्षे स्थानिक प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्य विषयांकडे असलेली पाठ अक्षम्य आहे. 

व्हिडिओ व्हायरल  

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका प्रेग्नेंट महिलेला दोन पुरूषांच्या मदतीने नेलं जातं असताना दिसत आहे. अशाच प्रकारची एक घटना 29 जुलैला समोर आली होती. या दरम्यान एका प्रेग्नेंट महिलेला उपचारासाठी 12 किमी पर्यंतचा प्रवास करावा लागला होता.