आंध्र प्रदेश : कोरोना व्हायरससारख्या महामारीच्या काळात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विजयवाडा मधील कोविड सेंटरमध्ये भीषण आग लाग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी आहेत. हे कोविड सेंटर विजयवाडामधील स्वर्ण पॅलेस हॉटेलमध्ये बनवण्यात आला होतं. रविवारी सकाळी ५च्या सुमारास ही दुर्घटना घडली त्यामुळे याठिकाणी सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
#UPDATE - Seven people have lost their lives and 30 have been rescued: Vijaywada Police https://t.co/9hs9dow2mV
— ANI (@ANI) August 9, 2020
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. विजयवाड्यातील स्वर्ण पॅलेस हॉटेलमध्ये कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये २२ रुग्ण उपचार घेत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अद्यापही या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. धुरामुळे दृश्यमानताही कमी झाली होती.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.