आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसची मुसंडी; जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्रीपदी बसणार

150 जागांवर वायएसआर काँग्रेस आघाडीवर

Updated: May 23, 2019, 04:03 PM IST
आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसची मुसंडी; जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्रीपदी बसणार title=

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक मतदानाच्या निकालाचा आकडा स्पष्ट होताना दिसत आहे. वायएसआर काँग्रेसने आश्चर्यकारक आघाडी घेतली असून ते बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. वायएसआर काँग्रेसचे यश स्पष्ट होत असताना पार्टीचे आमदार 25 मे रोजी बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी जगनमोहन रेड्डी तिरुपती मंदिरात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलनुसार, राज्यातील 175 विधानसभा जागांपैकी 150 जागांवर वायएसआर काँग्रेस आघाडीवर आहे. 

राज्यातील १७५ विधानसभा जागांसाठी २ हजार ११८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यापैकी सर्व जागांवर वायएसआर आघाडीवर असून नायडू पिछाडीवर आहेत. वायएयआर विधानसभा जागांवर आघाडीवर असून सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी पिछाडीवर आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांना आतापर्यंत विरोधी पक्षनेता म्हणून ओळखले जात होते. राजकीय नेत्याव्यतिरिक्त एक यशस्वी व्यावसायिक म्हणूनही जगनमोहन रेड्डी यांची ओळख आहे. राजकाराणात प्रवेश करण्यापूर्वी जगनमोहन रेड्डी यांनी 1999-2000 मध्ये व्यावसायिक म्हणून करियरची सुरुवात केली होती. कर्नाटकातील संदूर येथे त्यांनी एका पॉवर कंपनीची स्थापना केली. 2004 मध्ये वडील वाय.एस राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर जगनमोहन यांचा व्यवसाय वाढत जाऊन तो मीडियापर्यंतही पोहचला.