Viral Video: बटण दाबा Girlfriend मिळवा, मुलीनं सांगितलेली 'ही' ट्रिक ऐकून आनंद महिंद्रा यांनी दिली ऑफर

Anand Mahindra Viral Tweet Video: आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर (Anand Mahindra Viral Video) सक्रिय असतात. त्यामुळे ते ज्या कोणत्या पोस्ट शेअर करताना त्यांना तूफान लाईक्स येतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओ एक बटण दाबल्यावर (Rj Video Shared by Anand Mahindra) कशाप्रकारे एखादी मुलगी पटवू शकता याचं उदाहरणं व्हिडीओतील मुलीनं दिले आहेत. 

Updated: Apr 19, 2023, 07:05 PM IST
Viral Video: बटण दाबा Girlfriend मिळवा, मुलीनं सांगितलेली 'ही' ट्रिक ऐकून आनंद महिंद्रा यांनी दिली ऑफर title=

Mahindra XUV 700 Feature Viral Video: उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातून त्यांचे ट्विट्सही (Anand Mahindra Tweet) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असतात. सध्या त्यांचे असेच एक ट्विट सगळीकडेच व्हायरल झालं आहे. तुम्हीही हटके गाड्यांच्या प्रेमात असता? विविध स्टाईल्सच्या गाड्यांची तुम्हालाही क्रेझ असेलच. महिंद्रा XUV 700 (Mahindra and Mahindra Automobile) या गाडीबद्दलचे अनेक फिचर्स तुम्ही एकले असतीलच. परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला या गाडीचे काही फिचर्स हे नव्यानं कळतील. हा व्हिडीओ खुद्द आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर ट्विट केला आहे ज्यात एक मुलगी महिंद्रा XUV 700 चे हटके फीचर्स आपल्या भन्नाट स्टाईलमध्ये सांगताना दिसते आहे.

हा व्हिडीओ फक्त आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर पोस्ट केला नसून या मुलीनं सांगितलेले भन्नाट फिचर्स ऐकून तिला एक ऑफरही दिली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता ही मुलगी एक आरे आहे. जी रेडिओ मिर्चीमध्ये काम करते. महिंद्र एन्ड महिंद्रा कंपनीची एक गाडी SUV XUV 700 या मॉडेलचे फीचर्स सांगताना दिसते आहे. तिनं या गाडीच्या विविध पद्धतीनं रंजक पद्धतीनं सांगितले. (anand mahindra shares video on twitter anand mahindra gives an offer to the girl in video who explains interesting features)

असे सांगितले भन्नाट फीचर्स

या व्हिडीओमध्ये आरजे पुरखानं या गाडीतील भन्नाट फीचर्स रंजक पद्धतीनं सांगितले. तिनं सॉस कुठे मिळेल तर गाडीच्या वर ठेवलेल्या हॉल्डरमध्ये मिळेल, प्रेस बटण म्हणजे या बटणावर किल्क केल्यावर 'प्रेस' म्हणजे 'पत्रकार मंडळी' भेटतील हे तिनं सांगितले, कोणासोबत 'सेटिंग' करायचे असेल तर तर 'सेट' हे बटण दाबून तुम्ही करू शकता. 'क्रुज कंट्रोल' हे बटण हे दाबून क्रुज शिप बुक करता येईल, रेज्यूमे हे बटन दाबून तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करू शकता असं वेगवेगळ्या रंजक पद्धतीनं या गाडीतील फिचर्स आणि त्याचे महत्त्व सांगितले. 

हेही वाचा - कोणी 'थाला' कोणी 'मक्कल सेल्वन'; दाक्षिणात्त्य सुपरस्टार्सच्या 'या' Popular Titles मागची खरी कहाणी काय?

आनंद महिंद्रांकडून ऑफर 

आनंद महिंद्रांना हा व्हिडीओ इतका रंजक वाटला की त्यांनी सरळ आरजे पुरखा हिला ऑटोमोबाईलच्या डिझाईन स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहे आणि भविष्यात ती आपल्याला इनपुट्स देऊ शकते असं कॅप्शन टाकतं त्यांनी @RJ_Purkhaa ला टॅग केलं आहे आणि तिला ऑटोमोबाईल एक्सपर्ट असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे.