Anand Mahindra Tweet : भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर (Anand Mahindra Posts Viral Video) सक्रिय असतात. मध्यंतरी त्यांनी चालत्या फिरत्या हॉटेलचाही एक व्हिडीओ शेअर केला होता. जो इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता, अनेकदा ते असे फोटो नाहीतर व्हिडीओज ट्विटरवर (Anand Mahindra Twitter) शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात एक माकड चक्क फोनमध्ये काहीतरी करताना दिसतो आहे.
या व्हिडीओत घरी बेडरूममध्ये बेडवर (Monkey Watches Smartphone) एक मुलगी झोपलेली असताना तिथून एक माकड येत आणि ते चक्क तिच्या फोनमध्ये काहीतरी शोधू लागते. आपल्याप्रमाणेचही तेही फोनमध्ये नाक खूपसून बसताना दिसत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून नक्की पोट भरून हसाल. सध्या हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. (Anand Mahindra shares an interesting video on twitter where a monkey plays with a smartphone video goes viral)
आजकाल आपण सगळेच फोनमध्ये डोकं खूपसुन बसलेलो असतो तेव्हा आपल्यालाही एकप्रकारे मोबाईलचे व्यसन हे लागलेले आहे. हल्ली तरूण मुलं तर सोशल मीडियावर दिवसरात्र बसलेली असतात. त्यांना आजूबाजूचेही काही भान उरत नाही. आपल्याला रिल (Monkey Watching Reels on Smartphone) बघण्याचे आणि करण्याचेही व्यसन लागले आहे. असेही काहीचे व्यसन आता एका माकडालाही लागल्याचे पाहायला मिळते आहे. हे माकड बेडवर एका महिलेच्या बाजूला बसून मोबाईलवर रिल पाहात बसलं आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रांना नेहमीप्रमाणे आपल्या ट्विटर अकांऊटवरून एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माकड मस्त आरामात एका हातानं काहीतरी खात दुसऱ्या हातानं मोबाईलवर रिल पाहताना दिसत आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला बऱ्याच चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये एक गमतीदार कमेंट केली आहे.
— anand mahindra (@anandmahindra) April 7, 2023
हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. माणसांप्रमाणेच मोबाईमध्ये (Anand Mahindra Caption) नाक खूपसून बसलेल्या या माकडाकडे पाहून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, या बिचाऱ्याला कोणातरी माणसांपासून वाचवा. त्याखाली अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. माणसांच्या जगात आल्यावर प्राणीही माणसांसारखे वागू लागले तर मानवजातींनं जसं स्वत:च काही बाबतीत नुकसान करू घेतलं आहे त्याप्रमाणेच प्राण्याचे तसं होऊ नये म्हणून आनंद महिंद्रा यांनी असं काहीसं कॅप्शन लिहिलं आहे. हाच काहीसा या कॅप्शनचा मथितार्थ आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी @jadishmitra ला टॅग केलं आहे.