भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? नेटकऱ्याच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर देत Anand Mahindra म्हणाले

Anand Mahindra यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Dec 11, 2022, 05:24 PM IST
भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? नेटकऱ्याच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर देत Anand Mahindra म्हणाले title=

Anand Mahindra On Richest Person Of India: आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. बऱ्याचवेळा त्यांनी केलेल्या पोस्टनं नेटकऱ्यांना प्रोत्साहन मिळते. त्यांच्या अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होतात. अनेकवेळा आनंद महिंद्रा हे दुर्बल लोकांना मदत करताना दिसतात. दरम्यान, एका नेटकऱ्यानं आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारला की ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. 

हेही वाचा : ज्या फ्लॅटमध्ये Sushant Singh Rajput चा मृत्यू झाला तिथे भाडेकरु का रहायला येईनात? घर मालकानं ठेवली 'ही' अट

आनंद महिंद्रा यांचे नुकतेच ट्विटरवर 10 लाख फॉलोवर्स झाले. त्यानिमित्तानं आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. या ट्वीटवर उत्तर देत एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला की 'तुम्ही सध्या भारतातील 73 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात मग तुम्ही नंबर वन कधी होणार आहात?' (Anand Mahindra On Richest Person Of India)

'मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही'

या ट्वीटला उत्तर देत आनंद महिंद्रा म्हणाले, 'सत्य हे आहे की मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही कारण ही माझी तशी इच्छा कधीच नव्हती.' आनंद महिंद्रा यांनी दिलेले हे उत्तर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्यांनी दिलेल्या उत्तरानं प्रभावित झाले आणि आनंद महिंद्रा यांचे कौतुक करू लागले आहेत. त्यांच्या या ट्वीटवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर दहा मिलियन फॉलोअर्स (Anand Mahindra 10 Million Followers)
आनंद महिंद्रा यांचे नुकतेच ट्विटरवर दहा मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. त्यांनी सर्वांचे आभार मानले. आनंद महिंद्रा हे दिवसातून अनेक वेळा मजेदार व्हिडिओ आणि ट्विट शेअर करतात. सध्या त्यांचे भारतातील श्रीमंत व्यक्ती होण्याच्या प्रश्नाच्या उत्तराचे ट्विट व्हायरल होत आहे. (anand mahindra reply after asked by netizen about when he will become richest person of india)