नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह आता राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. आज झालेल्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी हे दोघे रिंगणात उतविणार आहे. या दोघांना गुजरातमधून मैदानात उतरणार येणार आहेत. दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आहे.
दरम्यान, बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाल आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय दलाची बैठक पार पडली.
या बैठकीत बिहारमधील घडामोडींवर चर्चा झाली. भाजपला बिहारमध्ये मध्यावधी निवडणुका नकोत, असं वक्तव्य भाजप नेते जे.पी.नड्डा यांनी संसदीय दलाच्या बैठकीनंतर केलेय.