नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. ताब्यात असलेली तिन्ही राज्य काँग्रेसच्या 'हाता'ला लागलीत. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय. भाजपचा राज्यांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व राज्यांतील भाजप प्रदेशाध्यांची बैठक बोलविली आहे. ही बैठक दिल्लीतील भाजप मुख्यालयात दुपारी २ वाजता होणार आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी पाज राज्यांची निवडणूक ही सेमी फायनल मानली जात होती. या सेमी फायनलमध्ये भाजपला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व राज्यातील भाजपच्या प्रदेशाध्यांची बैठक बोलविली आहे. २०१९मधील लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीतील पराभवानंतर खचून जाऊ नये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासंदर्भात अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत.