मुंबई : भारत आणि चीनमध्ये सध्या एलएसीवर तणाव आहे. लडाखमध्ये चीनची घुसखोरी थांबत नाही आहे. पण आता चीनचं टेन्शन वाढणार आहे. कारण सीमेपलीकडे चीन काय हालचाली करतंय, त्यावर भारताचं आता थेट लक्ष असणार आहे. त्यासाठी काय आहे भारताचा स्पेशल प्लॅन पाहूया.
मे २०२० मध्ये चीनचे सैनिक भारतीय हद्दीत घुसले. त्यानंतर भारत-चीन सीमेवर भारतानं मोठ्ठी फौज तैनात केली आहे. चीन है की सुधरेगा नही, हे भारताला माहीत असल्यानं आता भारतानं सर्वेलन्स सिस्टीम मजबूत करण्याची जबरदस्त तयारी केली आहे त्यामुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीवर २४ तास नजर ठेवता येणार आहे.
डोंगराळ भागात नजर ठेवण्यासाठी मिनी ड्रोन आणि अल्ट्रा-लॉन्ग-रेंज सर्वेलन्स कॅमेरे तैनात करण्यात येणार आहेत. इज्रायलचे काही उपग्रह आणि काही मानवरहित हवाई वाहनंही भाड्यानं घेण्याची तयारी आहे. वायुदलासाठी हैरॉप कमिकेज अटॅक ड्रोनही घेतले जाणार आहेत. बॉर्डर ऑब्जर्वेशन अँड सर्विलन्स सिस्टम अर्थात बॉसही डीआरडीओनं तयार केला आहे.
गेल्या ९ महिन्यांपासून भारत-चीनमध्ये तणाव आहे. चीननेही LAC वर मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केलीय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानंही जोरदार तयारी केलीय. पण सीमेपलीकडे चीन काय करतंय याचीही बित्तमबातमी या नव्या सर्वेलन्स सिस्टीममुळे भारताला कळणार आहे.