नवी दिल्ली : मोदी सरकार आता पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच फायदा होणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीसाठी आता तुम्हाला पेट्रोलपंपावर जाण्याची गरज नाहीये. कारण, आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेलसाठी पेट्रोल पंपावर रांग लावण्याची गरज पडणार नाहीये.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं की, आता लवकरच पेट्रोलियम पदार्थ म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडर ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध होणार आहेत.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे की, सर्व पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स साईट्सवर विक्री करण्यासंदर्भात काम सुरु आहे. यासंबंधी परवानग्या मिळण्याची वाट पाहत आहोत. या परवानग्या मिळताच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स साईट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
All petroleum Products to be on eCommerce Platform. Statutory Approvals from all concerned departments are in place. pic.twitter.com/4ckE6EBKQa
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) September 28, 2017
ही सुविधा सुरु झाल्यास याचा फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांनाही होणार आहे. तसेच पेट्रोल पंपांवर लागणाऱ्या रांगाही संपूष्टात येतील. मात्र, यासाठी केंद्र सरकारला काही नियमांमध्ये बदल करावे लागणार असल्याचं बोललं जात आहे.