नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी बीएसएफ जवानाच्या घरावर हल्ला केला. इतकेच नाही तर, बीएसएफ जवान रमीज अहमद यांची घरात घुसून हत्या केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपूररा परिसरात राहणाऱ्या बीएसएफ जवान रमीझ अहमद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री हल्ला केला. दहशतवाद्यांनी रमीझ यांची गोळ्या झाडून हत्या केली. रमीझ हे राजस्थानात सेवा बजावत होते आणि सध्या ते सुट्टीवर आले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात रमीझ यांच्या घरातील दोघेजण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर सैन्य दलाने परिसराला घेरलं आणि सर्वत्र सर्च ऑपरेशन सुरु केलं. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, रमीझ अहमद हे बीएसएफच्या ७३व्या बटालियनमध्ये कार्यरत होते.
J&K: BSF constable Rameez Ahmad Parray, shot dead by terrorists in Bandipora's Hajin pic.twitter.com/v5B0RxPkJS
— ANI (@ANI) September 27, 2017
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्य दलाने मंगळवारी हिज्बुल मुझाहिद्दीनचा म्होरक्या अब्दुल कयूम नजर याचा खात्मा केला होता त्यानंतर दहशतवाद्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आहे.