नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन (सोमवारपासून) 19 जुलै सुरू होत आहे. याआधी 18 जुलै नंतर एक मीटिंग होणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लोकसभा स्पीकर यांनी सुद्धा सर्वपक्षीय बैठक सायंकाळी 4 वा बोलवली आहे.
भाजपच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकदेखील आज आय़ोजित करण्यात येणार आहे. पावसाळीस सत्रात होणाऱ्या कामगाजाबाबत ही बैठक होणार आहे.
याशिवाय कॉंग्रेसने देखील आपल्या खासदारांची आज महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हर्चुअली आयोजित होणार आहे.
सूत्रांच्या मते केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात साधारण 15 विधेयकं पारीत करणार आहे. यात प्रामुख्याने डीएनए टेक्नॉलॉजी, असिस्टंट रिप्रोडक्टिव, ट्रिब्युनल रिफॉर्म विधेयकांचा सामावेश आहे.