सावधान! Credit Card द्वारे या गोष्टींसाठी पैसे देऊ नका, RBIचे मार्गदर्शक तत्वे जाणून घ्या

आपल्यापैकी प्रत्येकजण क्रेडिट कार्ड वापरतो, परंतु काही लोकांना त्याच्याशी संबंधित नियम माहित नसतात.

Updated: Jul 5, 2021, 12:58 PM IST
सावधान! Credit Card द्वारे या गोष्टींसाठी पैसे देऊ नका, RBIचे मार्गदर्शक तत्वे जाणून घ्या title=

मुंबई : भारतातील लोकं सध्या कॅशलेस व्यवहाराकडे वळले आहेत. त्यामुळे लोकं डिजीटल पेमेंट (Digital payment) आणि क्रेडीट कार्डचा (Credit Card) जास्त वापर करत आहेत. आजच्या काळात, बरेच लोकं खरेदी, प्रवासासाठी क्रेडिट कार्ड वापरतात. तसेच लोकांच्या खात्यात पैसे नसले तरी अनेक वेळा लोकं क्रेडिट कार्डवर कर्ज घेतात. या क्रेडीटची रक्कम फार मोठी नसेल तर, तुम्हाला हे कर्ज सहज उपलब्ध होतं.

आपल्यापैकी प्रत्येकजण क्रेडिट कार्ड वापरतो, परंतु काही लोकांना त्याच्याशी संबंधित नियम माहित नसतात. क्रेडिट कार्ड हे काही विशिष्ट देयकासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. कारण  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही गोष्टींसाठी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यावर बंदी घातली आहे.

क्रेडिट कार्डद्वारे पैसे देण्यावर मनाई

आरबीआयने ज्या ठिकाणी क्रेडिट कार्ड पेमेंट करण्यावर बंदी घातली आहेत. त्या आहेत फॉरेक्स ट्रेडिंग, लॉटरी तिकिटांची खरेदी, कॉल बॅक सर्व्हिसेस, बॅटिंग (सट्टेबाजी), स्वीपस्टेक्स (घोड्यांवर पैसे लावणे), जुगाराशी संबंधीत व्यवहार,  मासिके( Magazine ) खरेदी.

SBIकडून ग्राहकांना ईमेल

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBIने आपल्या ग्राहकांना ईमेल पाठवून RBIच्या या मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती दिली आहे.
मेलमध्ये असे नमूद केले आहे की, तेथे बरेच परदेशी विदेशी मुद्रा व्यापार करणारे व्यापारी, कॅसिनो, हॉटेल्स आणि वेबसाईट्स आहेत जी वरील उत्पादने आणि सेवांची जाहिरात करतात आणि आपल्याला आपल्या क्रेडिट कार्डद्वारे या सेवांसाठी पैसे देण्यास सांगतात. परंतु त्याचे देय क्रेडिट कार्डद्वारे केले जाणार नाही.

नियम काय आहे ते जाणून घ्या

विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 (Foreign Exchange Management Act, 1999)आणि इतर लागू नियमांनुसार वरील ठिकाणी खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करण्यास मनाई आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या नियमात नमूद केले आहे की, या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन झाल्यास कार्डधारक जबाबदार असेल आणि या व्यक्तीला भविष्यात कार्ड धारण करण्यासाठी देखील बंदी घातली जाऊ शकते.