दारुच्या नशेत आढळला रायन शाळेचा सफाई कामगार

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये झालेल्या प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर ही शाळा कोणत्याही धडा घेतांना दिसत नाही आहे. गुरुग्रामनंतर फरीदाबादमधील रायन शाळेमध्ये देखील निष्काळजीपणा दिसून येत आहे. आज सकाळी सेक्टर 21 च्या रायन इंटरनॅशनल स्कूल कॅम्पसमध्ये क्लीनर दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं.

Updated: Sep 11, 2017, 05:12 PM IST
दारुच्या नशेत आढळला रायन शाळेचा सफाई कामगार title=

नवी दिल्ली : गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये झालेल्या प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर ही शाळा कोणत्याही धडा घेतांना दिसत नाही आहे. गुरुग्रामनंतर फरीदाबादमधील रायन शाळेमध्ये देखील निष्काळजीपणा दिसून येत आहे. आज सकाळी सेक्टर 21 च्या रायन इंटरनॅशनल स्कूल कॅम्पसमध्ये क्लीनर दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या सफाई कामगारांचे ओळख पत्र नाही तसेच पोलीस व्हेरिफिकेशन ही झालेलं नाही. पालकांनी आज यावरुन शाळा परिसरात आंदोलन केलं. पोलिसांनी शाळेत आल्यानंतर पालकांना शांत केलं. शाळेला एका आठवड्याची मुदत देत याबाबत सर्व कमी असलेल्या गोष्टींची पूर्ती करण्यास सांगितलं आहे.

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये झालेल्या प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने केंद्र सरकार, हरियाणा सरकार आणि एचआरडी मिनिस्ट्रीला नोटीस पाठवून तीन आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.