दररोज कपडे घालण्याचा कंटाळा, म्हणून महिलेनं शोधून काढला रामबाण उपाय, तिचा हा जुगाड एकदा पाहाच

खरंतर या महिलेला कपडे घालण्याचा कंटाळा येतो. म्हणून तिने गजबच जुगाड केला आहे.

Updated: May 20, 2022, 03:58 PM IST
दररोज कपडे घालण्याचा कंटाळा, म्हणून महिलेनं शोधून काढला रामबाण उपाय, तिचा हा जुगाड एकदा पाहाच title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : 'व्यक्ती तितक्या प्रकृती', असं बरेच लोक बोलताना आपण पाहिलेच असणार आणि तुम्हाला ते पटलं देखील असणार, कारण जितके लोक तितकं वेगवेगळं त्याचं वागणं. लोक किंवा त्यांचे स्वभाव, विचार हे सारखे असतीलच असे नाही. आपण आपल्या बाजूला असे अनेक लोक पाहिले असतील जे जगावेगळं काहीतरी करण्याचं प्रयत्न करतात. सध्या एक महिला अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

खरंतर या महिलेला कपडे घालण्याचा कंटाळा येतो. म्हणून तिने गजबच जुगाड केला आहे. या महिलेचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

या माहिने कपडे घालावे लागू नये, म्हणून आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढला आहे. तसेच तिने स्वत: आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या महिलेने तिचे 30 वर्षांपूर्वीचे, 8 आठ वर्षांपूर्वीचे आणि आताचे असे एकत्र असलेले तीन फोटो शेअर केले आहेत. 1992, 2014 आणि 2022 मध्ये कर्स्टिन कशी दिसत होती. हे फोटोंमध्ये पाहिले जाऊ शकते.

तिन्ही फोटोंमध्येमध्ये कर्स्टिनची वेगवेगळी रूपं पाहायला मिळत आहे. सहा वर्षांपूर्वी तिने @tattoo_butterfly_flower या नावाने Instagram वर खाते तयार केले. सध्या तिचे सुमारे दोन लाख फॉलोअर्स आहेत. क्रेस्टीनने या अकाउंटवर त्याचे टॅटू केलेले फोटो शेअर केले आहेत.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कर्स्टिन ट्रिस्टनने आतापर्यंत तिच्या टॅटूवर £25,000 (रु. 24 लाखांहून अधिक) खर्च केले आहेत आणि आता तिने तिच्या Instagram खात्यावर आधी आणि नंतरचे फोटो अपलोड केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

50 वर्षीय क्रेस्टीनने तिच्या टॅटूमुळे सोशल मीडियावर दबदबा निर्माण केला आहे. टॅटू मॉडेल क्रिस्टिनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत.

तिच्या अंगावर रंगीबेरंगी फुलं, पक्षी, फुलपाखराच्या डिझाईन्स आहेत. आपला छंद पूर्ण करण्यासाठी तिने कोणाचीही पर्वा केली नाही. बातम्यांनुसार, कर्स्टिनला कपडे घालण्यासाठी खूप कंटाळा येत. ज्यामुळे ती कमी कपडे घालते आणि बाकीच्या भागांवर तिने टॅटू काढले.