मुंबई : समुद्री लूटेऱ्यांशी संबंधित आपण अनेक कथा, कार्टून किंवा चित्रपट पाहिले आहे. त्यावेळेस आपण हे पाहिलं असेल की, त्यामधील हे लूटेरे आपल्या एका डोळ्यावरती काळा किंवा लाल कपडा लावून झाकतात. परंतु ते असं का करतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? काहींना वाटतं की, त्याच्या डोळ्यांना कदाचित काही दुखापत झाली असावी, म्हणून असे केलं असावं. परंतु यामागचे खरं कारण काही वेगळंच आहे. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन या हॉलिवूड चित्रपटातही या प्रकारचा पायरेट कॅरेक्टर तुम्ही पाहिला असेल. त्याने देखील आपला एक डोळा झाकला आहे.
मानवी डोळे हा त्याच्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, ज्याच्या मदतीने आपण बाहेरचे जग पाहू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रकाशाकडून अंधाराकडे जाते तेव्हा त्याला सर्वत्र अंधार दिसतो. अंधारात आपण जेव्हा पाहातो तेव्हा आपल्या डोळ्यांची बुबुळ सामान्यपेक्षा जास्त मोठे होतात. ज्यामुळे आपण अंधारात पाहू शकतो.
पण जेव्हा एखादी व्यक्ती अंधाऱ्या खोलीतून उजेडात येते तेव्हा डोळ्यांच्या बाहुल्या पसरत नाहीत. उलट प्रकाशाच्या संपर्कात येताच डोळे लगेच वातावरणानुसार काम करू लागतात, त्यामुळे या लूटेऱ्यांना डोळ्यावर पट्टी बांधावी लागते.
जर आपण समुद्री लुटेऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, ते अनेक महिने पाण्यातून जहाजांमध्ये प्रवास करतात. सुर्याची किरणं जेव्हा पाण्यावर पडून रिफ्लेक्ट होतात, तेव्हा ते आणखी प्रखर होतात. ज्याचा डोळ्यांना त्रास होतो आणि अशा वेळी अंधारात गेल्यानं लोकांना अचानक दिसणं बंद होतं.
समुद्रातुन प्रवास करताना लुटेऱ्यांना वारंवार डेकवर जावे लागते आणि सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवावे लागते, हे ठिकाण अधारातील ठिकाण आहे. अशा परिस्थितीत जेव्हा हे लूटेरे डेकमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते डोळ्यांवरील काळी किंवा लाल पट्टी काढून टाकतात, जेणेकरून त्यांना अंधारातही वस्तू सहज दिसू लागतात.
समुद्री लूटेऱ्यांनी डोळ्यावर लावलेल्या पट्टीचा फायदा असा आहे की, जेव्हा ते प्रकाशातून अंधारात जातात तेव्हा त्यांच्या बुबुळाला पसरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कारण त्यांना अंधारात राहण्याची सवय असते. ज्यामुळे त्यांना स्पष्ट दिसते.