दुरून पाहिलं तर Wagon R कार; जवळून पाहिलं तर, भलतंच काहीतरी

Desi jugaad Wagon R Funny Video | भारतीय देसी जुगाडची चर्चा जगभर होत असते. इंटरनेटही जुगाड व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेले आहे. जिथे दररोज काहीना काही आश्चर्यकारक कन्टेन्ट वायरल होत असतो. 

Updated: Jun 15, 2022, 11:57 AM IST
दुरून पाहिलं तर Wagon R  कार; जवळून पाहिलं तर, भलतंच काहीतरी title=

मुंबई : नुकताच सोशल मीडियावर अशा 'वॅगन आर'चा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा मजेदार व्हिडिओ Instagram comedynation.teb वापरकर्त्याने शेअर केला आहे. आतापर्यंत या पोस्टला हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. खरं तर, ही क्लिप kalyug_hun नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली होती, त्यानंतर ही क्लिप वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली.

काय आहे या व्हायरल क्लिपमध्ये?
या छोट्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की लाल रंगाची वॅगन आर रस्त्यावरून वेगाने जात आहे. पण थोड्याच वेळात आपल्याला कळते की ही कार नसून एका भारतीयाचा देशी जुगाड आहे.  आपण 'वॅगन आर' समजत असलेले वाहनऑटो निघाली. ही क्लिप कधी आणि कुठे शूट करण्यात आली या बाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.