मुंबई : Airtel ने आपली 5G सेवा Airtel 5G Plus लाँच केली आहे. 5G Plus म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हा फक्त मार्केटिंगचा फंडा आहे. ही सेवा फक्त 5G साठी उपलब्ध असेल, फक्त 5G Plus नाव आहे. तुम्हाला एअरटेल 5G सेवेसाठी नवीन सिम कार्ड किंवा रिचार्ज करण्याची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे ही सेवा कायमची मोफत नसणारे. सध्या 8 शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाणार आहे.
कंपनीने 1 ऑक्टोबर रोजी त्यांची 5G सेवा लॉन्च केले होती. एअरटेलची 5G सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी या शहरात उपलब्ध असेल. कंपनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागात 5G सेवा सुरू करणार आहे.
ज्या लोकांकडे 5G फोन आहे आणि ते या शहरांमध्ये राहतात त्यांना Airtel 5G Plus ची सेवा सुरु झाली आहे. यासाठी त्यांना कोणत्याही नव्या रिचार्जची गरज नाही. त्याऐवजी, सध्याच्या रिचार्ज प्लॅनवरच ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट मिळेल.
पूर्ण रोलआउट होईपर्यंत कंपनी 5G स्पीड मोफत देईल. एअरटेलच्या मते, ग्राहकांना 5G Plus वर तीन फायदे मिळतील. ब्रँडचे म्हणणे आहे की ते ज्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत ते जगभरातील इकोसिस्टममध्ये वापरले जाते.
जगभरातील सर्व स्मार्टफोन एअरटेलच्या 5G नेटवर्कवर काम करतील. ग्राहकांना सध्याच्या वेगापेक्षा 20 ते 30 पट अधिक वेग मिळेल. तसेच उत्तम व्हॉईस कॉलिंग अनुभव आणि सुपर फास्ट कॉल कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.
गोपाल विटाल, MD आणि CEO, Airtel म्हणाले की, 'Airtel गेल्या 27 वर्षांपासून भारतीय दूरसंचार क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. आमचे ग्राहक आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत.
एअरटेल कंपनीने त्यांची 5G सेवा 1 ऑक्टोबर रोजी IMC 2022 मध्ये लॉन्च केली. अनेक युदर्संना 5G सिग्नल देखील मिळत आहेत आणि त्यांना इंटरनेटचा वेगही चांगला मिळत आहे.